(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरु आहे, कोरोना स्थितीवरुन राजनाथ सिंह यांची टीका
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. कोरोना स्थितीवरुन हल्लाबोल करताना महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरु असल्याचं ते म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही राजनाथ सिंह यांना उत्तर दिलं आहे.
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील कोरोना संकटाच्या परिस्थितीवरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील सरकार हे तीन पक्षांचं आहे. पण ते पाहून असं वाटतंय की सरकारच्या नावावर सर्कस सुरु आहे. विकासाचं जे व्हिजन हवं ते महाराष्ट्र सरकारकडे नाही, अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली. तसंच महाराष्ट्र सरकारला जी काही मदत हवी असेल ती केंद्र सरकार पुरवेल, असंही त्यांनी सांगितलं.
राजनाथ सिंह म्हणाले की, "महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती पाहता तिथे सरकार नावाची गोष्टच नाही, असं वाटतंय. सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. महाराष्ट्रातील सरकार हे तीन पक्षांचं आहे. पण ते पाहून असं वाटतंय की सरकारच्या नावावर सर्कस सुरु आहे. नाही. विकासाचं जे व्हिजन हवं ते महाराष्ट्र सरकारकडे नाही."
राजनाथ सिंह यांनी सोमवारी (8 जून) महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी 'व्हर्च्युअल रॅली''च्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनासारख्या जागतिक महामारीचं संकट किती मोठं आहे हे किमान महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. या संकटात महाराष्ट्राच्या जनताही धीटपणे सामोरं जात आहेत, असं राजनाथ सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.महाराष्ट्र की प्रदेश सरकार तीन दलों की सरकार है। लगता है सरकार के नाम पर सर्कस हो रहा है। विकास का जिस प्रकार का विजन महाराष्ट्र सरकार के पास होना चाहिए वह नहीं है। जबकि केंद्र सरकार हर सम्भव सहायता दे रही है।
— Rajnath Singh (@rajnathsingh) June 8, 2020
आज महाराष्ट्र के कार्यकर्ताओं से ‘वर्चुअल रैली’ माध्यम से बातचीत करने का सुअवसर प्राप्त हुआ। कोरोना जैसी वैश्विक महामारी का संकट कितना बड़ा है यह कम से कम महाराष्ट्र की जनता को बताने की आवश्यकता नही है। इस महासंकट में भी महाराष्ट्र की जनता पूरी मजबूती के साथ खड़ी हुई है। pic.twitter.com/02fMyDOQiV
— Rajnath Singh (@rajnathsingh) June 8, 2020
"कोरोनामुळे ज्या प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली आहे, तो गंभीर विषय आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी शक्य तेवढी मदत मोदी सरकार करत आहे. कोरोना या महामारीचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. हे आव्हान भारताने दृढ निश्चयासह स्वीकारलं आहे. भारत सरकारच्या प्रयत्नांमुळेच कोरोना संकटात जगातील अनेक विकसित देशांच्या तुलनेत भारताची स्थिती फारच चांगली आहे," असं राजनाथ सिंह म्हणाले.
शिवसेनेवर टीका करताना राजनाथ सिंह म्हणाले की, "निवडणुकीच्या वेळी शिवसेना आणि भाजपची युती झाली होती. पण सत्तेच्या हव्यासापोटी युती झाल्यानंतर भाजपला धोका देण्यात आला. मी भाजपची विचारधारा स्पष्ट करु इच्छितो, आम्हाला धोका मिळू शकतो पण धोका कधीच देऊ शकत नाही."
जब महाराष्ट्र में चुनाव लड़ना हुआ तो भाजपा और शिवसेना का गठबंधन हुआ। लेकिन गठबंधन के बाद सत्ता की हवस में भाजपा को धोखा दिया गया।
मैं भाजपा के चरित्र को स्पष्ट करना चाहता हूं कि- हम धोखा खा सकते हैं, लेकिन धोखा कभी दे नहीं सकते हैं।यह भाजपा का चरित्र रहा है। — Rajnath Singh (@rajnathsingh) June 8, 2020
मोदी सरकारच्या काळात भारताची प्रतिमा सुधारली : राजनाथ सिंह मोदी सरकारच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा सुधारल्याची बाब संपूर्ण जग मान्य करत आहे. 2013 मध्ये भारताची जी आर्थिक स्थिती होती, त्याच्या तुलनेत 2019 मध्ये भारताची स्थिती फारच सुधारली आहे. 2014 मध्ये मोदी पंतप्रधान बनले त्यावेळी मोदी सरकार पाच वर्षांमध्ये लोकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करतील की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. परंतु पाच वर्षांचा काळ गेला तेव्हा संपूर्ण देशाने मोदी सरकारच्या कामावर मोहोर उमट आणि 2019 मध्ये आधीपेक्षा जास्त बहुमत दिलं. 2014 ची निवडणूक असो किंवा 2019 ची लोकसभा निवडणूक, किंवा महाराष्ट्राची निवडणूक सगळीकडे भाजपला पूर्ण समर्थन दिलं.
सरकारला सर्कस बोलणार्या राजनाथ सिंह यांचे 'अनुभवाचे बोल' : नवाब मलिक राजनाथ सिंह यांनी केलेल्या टीकेला राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. "लोकशाही मार्गाने चालणार्या सरकारला सर्कस बोलणार्या राजनाथ सिंह यांचे 'अनुभवाचे बोल' आहेत, असं नवाब मलिक म्हणाले. "महाराष्ट्रामध्ये लोकशाही मार्गाने सरकारचे काम सुरु आहे. कोरोना काळात सरकारने केलेल्या कामाचे ICMR ने मुंबई मॉडेलची स्तुती केली आहे. मात्र असे असताना केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह रिंग मास्टरच्या चाबूकने चालवले जाणारे सरकार असे वक्तव्य करत आहेत, असंही मलिक म्हणाले.