Chitra Wagh VIDEO : तुमच्यावर बापासारखं प्रेम केलं, तुम्ही माझ्या कुटुंबाला गोत्यात आणलं; चित्रा वाघ यांचा शरद पवारांवर आरोप
Chitra Wagh Allegations On Sharad Pawar : माझी मूठ झाकलेली आहे, ती उघडायला लावू नका, नाहीतर पवारसाहेबांना त्रास होईल असा थेट इशारा चित्रा वाघ यांनी दिला.
मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत असताना चित्रा वाघ यांनी आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनाच थेट इशारा दिला आहे. पवार साहेब, तुमच्या या गँगला आवरा, असे कच्चे खिलाडी पाठवू नका अन्यथा तोंडावर पडाल असं चित्रा वाघ म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी माझी नावं 100 लोकांसोबत जोडल्याचा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यामध्ये चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्या सून गौरी चव्हाण यांचे संभाषण समोर आलं. चित्रा वाघ यांनी आपल्या घरात भांडणं लावली असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला. तर माझी मूठ झाकलेली आहे, ती उघडायला लावू नका नाहीतर पवारसाहेबांना त्रास होईल असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.
20 वर्षांत पवारांनी मला काय दिलं?
20 वर्षांमध्ये पायाचे कातडे काढून पक्षाला दिले, पण शरद पवारांनी आपल्याला काय दिलं असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला. त्या म्हणाल्या की, पवारसाहेब आणि बारामतीच्या ताईंना माझ्या कामाची उजळणी होईल. चित्रा वाघमध्ये काहीतरी क्वॉलिटी आहे म्हणून संधी मिळाली. गेल्या 20 वर्षात त्यांनी जी जबाबदारी दिली ती पार पाडली. काय परिणाम होतील याची काळजी न करता मी जबाबदारी पार पाडली. कधीही लाभाच्या पदाची अपेक्षा केली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चित्रा वाघला 20 वर्षांत एकही लाभाचं पद दिलं नाही.
पवारसाहेब, तुमच्या गँगला आवरा
चित्रा वाघ यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना इशारा दिला. त्या म्हणाल्या की, पवारसाहेब, याने तुम्हाला वाटत असेल की माझ्यावर दबाव येईल, चित्रा वाघचा आवाज दाबला जाईल तर तसं होणार नाही. पवारसाहेब, असे कच्चे खिलाडी पाठवू नका, तोंडावर पडाल.
पवारसाहेबांवर मी बापासारखं प्रेम केलं, पण त्याबदल्यात तुम्ही काय दिलं असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. त्या म्हणाल्या की, कुठूनतरी कसेतरी गोत्यात आणायचं काम करताय ना ते थांबवा. 20 वर्षे तुमच्या पक्षात होते. तुम्ही माझ्या परिवाराला गोत्यात आणायचं काम केलं. मी सगळं सहन केलं. अशा किती बायका माझ्याविरोधात उभ्या कराल? माझं नाव 100 लोकांसोबत जोडलं. आता या बाईला उभं केलं. तुमच्याकडे ही गौरी चव्हाण आली असती तर काय केलं असतं? कुणीही महिला अडचणीत आली तर मी तिला सहकार्य करणारच.
ही बातमी वाचा: