एक्स्प्लोर
राज्यात बालमृत्यूचं प्रमाण वाढलं, आकडेवारी देत आरोग्यमंत्र्यांची कबुली
0 ते 28 दिवसांमध्ये 65% बालमृत्यू झाल्याचे समोर आले आहे, तर 21 % बालमृत्यू 28 दिवस ते एक वर्ष आणि 14 % बालमृत्यू हे एक ते पाच वर्षे वयोगटातील आहेत.
मुंबई : राज्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याची कबुली राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेतील लेखी उत्तरात दिली. धक्कादायक बाब म्हणजे, राज्यात HMIS च्या अहवालानुसार 2017-18 या वर्षात 24 तासाच्या आत मृत्यू पावलेल्या अर्भकांची संख्या 3 हजार 778 एवढी आहे.
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत काय माहिती दिली?
"राज्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. राज्यात HMIS च्या अहवालानुसार 2017-18 या वर्षात 24 तासाच्या आत मृत्यू पावलेल्या अर्भकांची संख्या 3 हजार 778 एवढी आहे. मुंबई शहरात 483 बालकांचे मृत्यू झाल्याचे आढळले. तसेच, एप्रिल 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत तब्बल 13 हजार 541 बालमृत्यू झाले.", अशी माहिती डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
बालमृत्यूची कारणं काय?
- सर्वाधिक म्हणजे 22 % बालमृत्यू कमी वजनाच्या व अपुऱ्या दिवसांच्या अर्भकांचे झाले.
- न्यूमोनिया व जंतू संसर्गामुळे 7 % बालमृत्यू
- अतिसारामुळे 0.32 % बालमृत्यू
- श्वसनाच्या आजारामुळे 7 % बालमृत्यू
- श्वसनामार्गाच्या विकारामुळे 10% बालमृत्यू
दरम्यान, या बालमृत्यूंपैकी 0 ते 28 दिवसांमध्ये 65% बालमृत्यू झाल्याचे समोर आले आहे, तर 21 % बालमृत्यू 28 दिवस ते एक वर्ष आणि 14 % बालमृत्यू हे एक ते पाच वर्षे वयोगटातील आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement