एक्स्प्लोर

Maratha Reservation : आंतरवाली सराटीमधील बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य

Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये आज मराठा आरक्षणाबाबत महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यापूर्वी यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबरला संपत असून, या पार्श्वभूमीवर आज आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) महत्वाचे बैठक बोलवण्यात आली आहे. ओबीसीमधूनच (OBC) आम्हाला मराठा आरक्षण हवे असल्याची भूमिका मांडणारे मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. दरम्यान, काही तासांत या बैठकीला सुरवात होणार असून, त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केले आहे. "दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढणार नाही, तसेच ओबीसी यांचे आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे.” त्यामुळे ओबीसीमधूनच आरक्षण हवे असल्याची भूमिका घेणारे जरांगे यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 

आंतरवाली सराटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आजच्या बैठकीवर प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "सरकारचे धोरण स्पष्ट आहे. सरकारची भूमिकाही स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कुठल्याही इतर किंवा ओबीसी समाजाचा आरक्षण कमी न करता, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम असल्याचे,” मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

उद्धव ठाकरेंवर टीका...

मुंबईतील वेगवेगळ्या भागात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला सुरवात झाली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या धारावी बचाव मोर्च्यावरून देखील टीका केली आहे. "काल काढलेला विकास विरोधी मोर्चा होता. धारावी आशिया खंडातील एक मोठी झोपडपट्टी आहे. तिथे लोक कसे राहतात, कोणत्या परिस्थितीत राहतात. त्यांचं जीवन उंचावलं पाहिजे. त्यांना चांगल्या सोय-सुविधा मिळाल्या पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे. यापूर्वीचा जो कंत्राटदार होता, त्याचं कंत्राट का रद्द करण्यात आलं. जर तुमचा आदानी यांना विरोध असेल, तर यापूर्वीच्या कंत्राटदारालाही का विरोध होता. मला वाटतं काही तडजोडी तुटल्या असतील, त्यामुळे हे सर्व काही घडत असेल. मात्र, सरकार संपूर्ण धारावीकरांच्या मागे आहे. हे लोकं पूर्णपणे विकास विरोधी आहे. प्रत्येकवेळी विकासाचे प्रकल्प थांबवण्याचे काम यांच्याकडून करण्यात येते. परंतु, आमचं सरकार पूर्णपणे धारावीकरांना न्याय देईल. धारावीकरांच्या विकासात कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तिक फायदा होणार नाही, धारावीतील प्रत्येक माणसाचा आम्ही फायदा करू, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

एकीकडे जरांगेंची बैठक, दुसरीकडे आंतरवाली सराटी प्रकरणात मराठा आंदोलकांना पोलिसांची नोटीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thorat Majha Katta| देशमुखांच्या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात, जयश्री थोरात माझा कट्टावरRaj Thackeray Full Speech Prabhadevi:लेकासाठी बापाचं पहिलं भाषण;राज ठाकरेंनी धू धू धुतलं : ABP MajhaAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : सना मलिकांना उमेदवारी कशी मिळाली? Nawab Malik ExclusiveYogendra Yadav Vastav EP 103|भाजप विरोधी पक्षांना सामाजिक चळवळींचे स्वरूप येण्याची गरज-योगेंद्र यादव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Mahendra Thorave : अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला आमदार महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Embed widget