एक्स्प्लोर

भाजप नेते राजू शिंदेंना पक्षप्रवेशापासून रोखण्याचे प्रयत्न सुरूच, आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावेंची मध्यस्थी

पक्षप्रवेशापासून रोखण्यासाठी आज आमदार हरिभाऊ बागडे आणि राजू शिंदे यांच्यात बैठक सुरू असून मंत्री अतुल सावे देखील या बैठकीत सहभागी झाले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला गळतीला सुरुवात झाली आहे. भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भाजपकडून राजू शिंदेंना पक्षात थांबवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजप नेते हरिभाऊ बागडे व अतुल सावेंची माजी उपमहापौर राजू शिंदेसोबत बैठक सुरू आहे.

7 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. भाजप नेते राजू शिंदे यांच्यासह आठ ते दहा नगरसेवक व पदाधिकारी देखील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान,  कालपासून राजू शिंदे व पदाधिकाऱ्यांनी भाजप सोडून जाऊ नये, यासाठी मनधरणी सुरू आहे. 

दरम्यान,आज आमदार हरिभाऊ बागडे आणि राजू शिंदे यांच्यात बैठक सुरू असून मंत्री अतुल सावे देखील या बैठकीत सहभागी झाले आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात लढा देऊ शकू असा दावा करत राजू शिंदेंसह इतर नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतलाच दिसून येते..

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची भावना काय?

भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये नेमकी काय भवना आहे, याबाबत भाजपाचे नेते तथा संभाजीगरचे माजी महापौर राजू शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले पाहिजे, अशी कार्यकर्ते आणि नागरिकांची इच्छा आहे. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा आमचा विचार चालू आहे. येथे भाजपा फक्त शिंदे गटाचे काम करण्यासाठीच राहिलेली आहे, असं आम्हाला वाटत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शहरात चांगली परिस्थिती होती. पण आम्हाला ही निवडणूक लढवता आली नाही. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून भाजपाने येथे मेहनतीने काम केलं होतं. पण ही जागा शिंदे गटाला दिली गेली. लोकसभा निवडणुकीतही आम्ही त्यांचं काम केलं. पण शिंदे गटाच्या स्थानिक आमदार, खासदारांनी भाजपाची कृतज्ञता व्यक्त केली नाही, असे राजू शिंदे यांनी सांगितले.

7 जुलैला होणार पक्षप्रवेश सोहळा

उद्धव ठाकरे देणार संभाजीनगर भाजपाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. येणाऱ्या सात जुलैला भाजपाच्या अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. हा प्रवेश म्हणजे मंत्री अतुल सावे यांना मोठा राजकीय धक्का असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाठ यांची अडचण वाढणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. यातील एका नगरसेवकाने गत निवडणुकीमध्ये विधानसभा ही लढवलेली होती.

हेही वाचा:

उद्धव ठाकरेंचा संजय शिरसाट, अतुल सावेंना मोठा धक्का; संभाजीनगरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी शिवबंधन बांधणार!

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pramod Jadhav Satara: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; ऐकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सोलापूरमधील घटनेनं महाराष्ट्र रडला!
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; ऐकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सोलापूरमधील घटनेनं महाराष्ट्र रडला!
Raj Thackeray and Nitesh Rane: राज ठाकरेंनी सभेत अदानी समूहाच्या विस्ताराचा व्हिडीओ दाखवला, नितेश राणेंची ठाकरे बंधूंवर टीका, म्हणाले....
राज ठाकरेंनी सभेत अदानी समूहाच्या विस्ताराचा व्हिडीओ दाखवला, नितेश राणेंची ठाकरे बंधूंवर टीका, म्हणाले....
Bigg Boss Marathi 6 Contestants: प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
Raj Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Shivaji Park Sabha: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Prakash Mahajan On Sanjay Raut Thane : संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरली
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pramod Jadhav Satara: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; ऐकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सोलापूरमधील घटनेनं महाराष्ट्र रडला!
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; ऐकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सोलापूरमधील घटनेनं महाराष्ट्र रडला!
Raj Thackeray and Nitesh Rane: राज ठाकरेंनी सभेत अदानी समूहाच्या विस्ताराचा व्हिडीओ दाखवला, नितेश राणेंची ठाकरे बंधूंवर टीका, म्हणाले....
राज ठाकरेंनी सभेत अदानी समूहाच्या विस्ताराचा व्हिडीओ दाखवला, नितेश राणेंची ठाकरे बंधूंवर टीका, म्हणाले....
Bigg Boss Marathi 6 Contestants: प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
प्रसिद्ध बॉडी बिल्डर ते महाराष्ट्राचा छोटा डॉन; 'हे' आहेत बिग बॉस मराठीचे 17 स्पर्धक
Raj Thackeray And Uddhav Thackeray Mumbai Shivaji Park Sabha: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO
Pandharpur Accident : पंढरपूरात भीषण अपघात! चंद्रभागा नदीच्या पुलावरून कंटेनर अन् ऊसतोड मजुरांसह ट्रॅक्टर खाली कोसळला
पंढरपूरात भीषण अपघात! चंद्रभागा नदीच्या पुलावरून कंटेनर अन् ऊसतोड मजुरांसह ट्रॅक्टर खाली कोसळला
Devendra Fadnaivs : मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, अजित पवार 15 तारखेनंतर बोलणार नाहीत : देवेंद्र फडणवीस
देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं,अजित दादा बोलतात, माझं काम बोलतं : देवेंद्र फडणवीस
IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
Embed widget