बदलापूरच्या 'त्या' शाळेतील मुलगी घर सोडून छत्रपती संभाजीनगर शहरात, सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून...
दामिनी पथकाने स्थानकावर मुलगी बसल्याची माहिती मिळताच लगेच धाव घेते तिला सुखरूप ताब्यात घेतलं आहे. दामिनी पथकातील बदलापूर अत्याचार प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या त्या शाळेचीच ती विद्यार्थिनी आहे.
Chhatrapati Sambhajinagar: राज्यात बदलापूर अत्याचार प्रकरणाने जनक्षोभ उसळला होता. बदलापूरच्या त्या शाळेत चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर शाळेत घुसत तोडफोड करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून बदलापूरच्या 'त्या' शाळेतील 15 वर्षाच्या मुलीनं घर सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून या मुलीने घर सोडलं व रात्रीच्या रेल्वेने ती छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाली. या घटनेची खबर मिळताच दामिनी पथकाने रेल्वे स्थानकावर धाव घेत या मुलीस सुखरूप ताब्यात घेतलंय.
नक्की प्रकरण काय?
वडिलांच्या त्रासाला कंटाळून बदलापूरची पंधरा वर्षांची सावत्र मुलगी घर सोडून बाहेर पडली. शुक्रवारी रात्री दोन वाजताच्या रेल्वेने ती छत्रपती संभाजीनगर शहरात आली. शनिवारी दिवसभर ती स्थानकावरच बसून राहिली. बदलापूर पोलिसांकडून दामिनी पथकाला त्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे दामिनी पथकाने स्थानकावर मुलगी बसल्याची माहिती मिळताच लगेच धाव घेते तिला सुखरूप ताब्यात घेतलं आहे. दामिनी पथकातील बदलापूर अत्याचार प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या त्या शाळेचीच ती विद्यार्थिनी आहे.
सावत्र वडील त्रास देत असल्याने घर सोडले
बदलापूरच्या अत्याचार प्रकरणातील वादग्रस्त ठरलेल्या त्या शाळेतील पंधरा वर्षाच्या या मुलीने सावत्र वडील त्रास देत असल्याचे सांगितलं. नुकतेच दहावी उत्तीर्ण झालेल्या या मुलीच्या आईने दुसरे लग्न केले होते. तिचे सावत्र वडील तिला त्रास देत होते त्यामुळे कंटाळून गुरुवारी रात्री मोबाईल बंद करून तिने घर सोडले. दामिनी पथकाने विश्वासात घेतल्यानंतर तिने सर्व प्रकार सांगितला.
शुक्रवारी रात्री निघाली शनिवारी स्थानकावरच
शुक्रवारी रात्रीच्या रेल्वेने ती छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाली. शनिवारी दिवसभर ती स्थानकावर बसून राहिली. बदलापूर पोलिसांकडून दामिनी पथकाला तिची माहिती देण्यात आली होती. दामिनी पथकाने लगेच धाव घेत तिला सुखरूप ताब्यात घेतलं आहे. सोडल्याची धक्कादायक घटना घडली असून बदलापूरच्या 'त्या' शाळेतील ही मुलगी असला तर समजतंय.
पोलिसांनी केला कुटुंबाला संपर्क
रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतल्यानंतर दामिनी पथकाने या मुलीचा विश्वासात घेऊन नक्की काय झाले हे समजून घेतले. महिला पोलिसांनी या मुलीच्या कुटुंबाला संपर्क केला. यानंतर तिची आई रात्री छत्रपती संभाजी नगरमध्ये तिला घेण्यास निघाली. तिच्या जेवण राहण्याची व्यवस्था पोलीस करत असल्याचे पाहून मुलीला अश्रू अनावर झाले होते.