एक्स्प्लोर
ATM मध्ये फक्त 2 हजारच्या नोटा, सुट्ट्या पैशांची अभूतपूर्व टंचाई
मुंबई : नोटाबंदीनंतर आता बँकांसमोरील रांगा काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. मात्र 'कुणी चिल्लर देता का चिल्लर', असा प्रश्न आता लोकांसमोर पडला आहे. कारण सध्या सुट्ट्या पैशांचा मोठा तुटवडा बाजारात दिसत आहेत.
बँकांमध्ये जुन्या 500, 1000 च्या नोटा बदलून मिळणार नाही
केंद्र सरकारने 8 नोव्हेंबरपासून जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा बंद केल्या. त्यानंतर सरकारने दोन हजाराची नोट चलनात आणली. सध्या अनेक एटीएममधून दोन हजारची नोट निघत आहे. मात्र या नोटांचे सुट्टे पैसे कसे करायचे, हा मोठा प्रश्न आहे.नोटाबंदी : सरकारच्या नवीन निर्णयानंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
या अडचणीमुळे जवळ पैसे असूनही नागरिकांना खर्च करता येत नाहीत. नव्या पाचशेच्या नोटा जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्या तर हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. मात्र बहुतांश एटीएममध्ये सध्या फक्त दोन हजारच्याच नोटा उपलब्ध आहेत.1000ची नोट थेट बँकेतच जमा करा, 500च्या नोटा फक्त इथे स्वीकारणार!
जुन्या हजार, पाचशेच्या नोट बंद झाल्यानंतर शंभरच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला होता. ही परिस्थिती आता निवळली असली तरीही बाजारात सुट्ट्या पैशांवरुन ग्राहकांची मोठी अडचण होताना दिसत आहे.काळा पैसेवाल्यांचा फास आवळला, बेहिशेबी रकमेवर 50 टक्के टॅक्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement