सोनिया सेनेच्या गुलामीसाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान, भाजपचा पलटवार, संघाच्या निशाणाला फडकं म्हटल्याने हल्ला
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली होती. यावरून आता महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, नड्डा बोलले की देशात एकच पक्ष राहील. पूर्वी एक विधान, एक निशाण एक प्रधान आहे असे ते म्हणाले. आम्हाला वाटले होते की, तिरंग्यासाठी करत आहेत. पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकत नव्हता. यांचं फडकं फडकत होतं. ते फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही. आमच्या देशाचा तिरंगा हा तसाच राहणार आहे. संविधान तसेच राहणार आहे. पंतप्रधान लोकांनी निवडून दिलेलाच राहणार आहे. पुतीनसारखा निवडून येणार नाही, अशी टीका त्यांनी संघावर केली.
भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं उद्धव ठाकरेंचा नतदृष्टेपणा
यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स या सोशल मिडीयावर माध्यमावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पोस्टमध्ये म्हटलं आहे की, परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला.
सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान
हाच भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्याच झेंड्याखाली शिवसेना उभारली पण उद्धव ठाकरेंना ते फडकं वाटतंय. आज बाळासाहेब ठाकरे असते तर भगव्या ध्वजाचा असा अपमान त्यांनी कधीचवानं सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरे भगव्याचा अवमान करत आहेत.
उद्धव ठाकरे थोडी जनाची नाही तर मनाची लाज उरली असेल तर भगवा ध्वज काय आहे हे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या शब्दात वाचा...
कभी थे अकेले हुए आज इतने
नही तब डरे तो भला अब डरेंगे
विरोधों के सागर में चट्टान है हम
जो टकराएंगे मौत अपनी मरेंगे
लिया हाथ में ध्वज कभी न झुकेगा
कदम बढ रहा है कभी न रुकेगा
न सूरज के सम्मुख अंधेरा टिकेगा
निडर है सभी हम अमर है सभी हम
के सर पर हमारे वरदहस्त करता
गगन में लहरता है भगवा हमारा॥
भगव्या ध्वजाला फडकं म्हणून तुम्ही कितीही शिव्याशाप दिल्या तरी हाच भगवा सदैव आमचं रक्षण करणार आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या