जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने केला सात विद्यार्थिनींचा लैगिक छळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना
चंद्रपूर जि.प. शाळेतील शिक्षकाने सात विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचं समोर आलं असून त्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

चंद्रपूर: शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना चंद्रपुरात घडली आहे. जिल्ह्यातील जीवती तालुक्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाने सात मुलींचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. या प्रकरणी दोषी शिक्षकाला अटक करण्यात आली असून आज जिल्हा बाल कल्याण समिती समोर पीडित मुलींची साक्ष नोंदविण्यात आली.
शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अतिशय विश्वास ठेवावा अशी व्यक्ती. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात एका नराधम शिक्षकाने या नात्याला काळिमा फासणारं कृत्य करून सर्वांच्याच माना शरमेने खाली केल्या आहे. उत्तरपत्रिका तपासण्याच्या बहाण्याने हा शिक्षक विद्यार्थिनींशी लगट करायचा. गेले काही महिने हा प्रकार सुरू होता. मात्र काही मुलींनी पालकांशी बोलताना या प्रकाराची वाच्यता केल्याने ही घटना उजेडात आली.
पीडित मुलींच्या तक्रारीवरून जिवती पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवून 57 वर्षीय ए.के. राठोड या दोषी शिक्षकाला अटक करण्यात आली. सध्या या प्रकरणात सात पीडित विद्यार्थिनींनी आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविला आहे. मात्र या प्रकरणात अनेक मुलींचा लैंगिक छळ झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पीडित मुली या अल्पवयीन असल्याने या प्रकरणात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्व पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरणाची सूत्रे हाती घेतली आहे.
जिवती हा तालुका तेलंगणाच्या सीमेवर असून अतिशय दुर्गम आहे. अशा दुर्गम आणि मागास भागात शाळकरी मुलींवर अशा प्रकारचे लैंगिक अत्याचार मुलींना शिक्षणापासून दूर नेणारे ठरू शकतात. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल हे सुनिश्चित केले पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Thane : बलात्कार करून अल्पवयीन मुलीची हत्या, नराधमाला फाशी, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
- Nashik News : नाशिकच्या कारागृहातील खळबळजनक प्रकार, तुरुंग अधिकाऱ्यानेच केली कैद्याची मदत
- Daund Crime : भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केल्याचा राग, 23 जणांच्या टोळक्याचा पोलिसासह मित्रांवर जीवघेणा हल्ला
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या






















