Nashik News : नाशिकच्या कारागृहातील खळबळजनक प्रकार, तुरुंग अधिकाऱ्यानेच केली कैद्याची मदत
Nashik : नोंदवहीमध्ये खाडाखोड केली, व्हाईटनर लावून काही फेरबदल. शिक्षा वॉरंट, नोंदवहीमध्ये न्यायाधीन कालावधी, बाह्यदिवस कालावधी, माफिचे दिवस या नोंदीवर व्हाईटनर लावून खाडाखोड केल्याचा प्रकार
Nashik Crime News : नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. चक्क तुरुंग अधिकाऱ्यांनीच गुन्हेगारांची मदत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुरुंग अधिकाऱ्याने गुन्हेगाराची मदत करण्यासाठी नोंदवहीमध्ये खाडाखोड केली, व्हाईटनर लावून काही फेरबदल केले. शिक्षा वॉरंट, नोंदवहीमध्ये न्यायाधीन कालावधी, बाह्यदिवस कालावधी, माफिचे दिवस या नोंदीवर व्हाईटनर लावून खाडाखोड करून गैरप्रकार केल्याचं समोर आले आहे.
तुरुंग अधिकाऱ्याने स्वतः च्या फायद्यासाठी शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग अधिकारी श्रेणी 1 शामराव आश्रुबा गिते,तत्कालीन तुरुंग अधिकारी श्रेणी 2 माधव कामाजी खैरगे, तत्कालीन वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डाबेराव या तिघांवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर पोलीस महासंचालकांचा आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2017 मध्ये हा प्रकार घडला होता. राजकुमार साळी तुरुंग अधीक्षक असताना हा प्रकार घडला. साळी यांच्या बदलीनंतर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीने चौकशी केली. या चौकशीमध्ये तथ्य आढळून आल्यानं गुन्हा दाखल कऱण्यात आला. या प्रकरणी कैदी श्रीहरी राजलिंगम गुंटूका याचा जबाब नोंदण्यांत आला. आर्थिक गैरव्यवहार करून संगनमताने कायद्यांची मदत केल्याचं श्रीहरीने जबाबात सांगितले. आर्थिक व्यवहार करून शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना सुट्टीमध्ये सूट दिल्याचेही सांगितले.
कुठे झाला फेरफार?
राजलिंगम गुंटूका याला 14 दिवसाची संचित रजा मंजूर असताना 409 दिवस फरार होता, पोलिसांनी हजर केले मात्र नोंदवही मध्ये केवळ 44 दिवस उशीराने आल्याचे दाखविण्यात आले. व्यंकट रामलू व्यकटया या कैद्याला रजेवर सोडण्यात आले, मात्र हा नियत कालावधीत हजर न होता 3 हजार 435 दिवस उशिराने हजर झाला. मात्र नोंदवहीमध्ये खाडाखोड करून 2 हजार 706 दिवस दाखविण्यात आले. विलास बाबू शिर्के या कैद्याला माफिच्या दिवसांची नोंद 1 हजार 407 असताना खाडाखोड करुन 2हजार 127 दिवसाची करून कारागृहातून मुक्त करण्यात आले.
हे प्रकरण समोर आल्यानंतर आता मागील काही दिवसांचे रेकॉर्ड तपासले जाणार आहेत. यामध्ये आणखी काय माहिती मिळते? हे लवकरच समोर येईल. पोलीस या प्रकरणाचा अधीक तपास करत आहेत.