Pratibha Dhanorkar: "ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर..."; सगेसोयरे अध्यादेशाला प्रतिभा धानोरकरांचा कडाडून विरोध
Chandrapur News: राज्यसरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाला चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी कडाडून विरोध केलाय.
Chandrapur News चंद्रपूर : राज्यसरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाला चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) यांनी कडाडून विरोध केलाय. विशेष म्हणजे या अध्यादेशाविरुध्द 7 तारखेला चंद्रपुरात ओबीसी, एसबीसी आणि व्हीजे-एनटी यांचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
या मोर्चात आमदार धानोरकर यांचा देखील सक्रीय सहभाग असणार आहे. आमदार प्रतिभा धानोरकर यांनी या अध्यादेशाविरुध्द ओबीसी (OBC Reservation) एकवटतील असा इशारा दिला असून लोकसभेत देखील हा मुद्दा गाजणार असल्याचं सूतोवाच केलंय. सोबतच पक्षाने आदेश दिला नसला तरी लोकसभेची दावेदार म्हणून मी माझी पूर्वतयारी सुरु केली आहे. चंद्रपूर लोकसभेसाठी दुसरा कोणी दावेदार नसल्याने पक्षाची तिकीट मला मिळेल याची 100 टक्के गॅरंटी असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर...
मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेश हा अतिशय चुकीचा असून तमाम ओबीसी समाजावर अन्यायकारक असा निर्णय आहे. आजघडीला ओबीसीमध्ये 395 जाती समाविष्ट आहे. असे असताना केवळ 17 टक्केच आरक्षण ओबीसी समाजाच्या वाट्याला आले आहे. मात्र दिलेले आरक्षण सुद्धा अद्याप कोर्टात स्टॅन्ड झालेले नाही. त्यामुळे ओबीसीमधून जर का मराठ्यांना आरक्षण दिले तर आमचा या भूमिकेला विरोध कायम असणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचा विरोध नसून तो ओबीसी वर्गातून देण्यात येत आहे, या गोष्टीला आमचा विरोध आहे. कारण ओबीसींना दिलेले आरक्षण हेच अद्याप ओबीसींना मिळालेलं नाही. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला जर धक्का लागला तर, ज्या पद्धतीचं मराठ्यांचं एकवटलेले चित्र उभ्या महाराष्ट्रानं बघितलं , त्याच पद्धतीचं चित्र हे भविष्यात ओबीसींच्या बाबतीत सुद्धा बघायला मिळेल, इशारा काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे.
चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांनी ओबीसींच्या जनगणना करण्याचा विषय सभागृहात रेटून धरला होता. आगामी लोकसभेतही बरेच ओबीसी खासदार त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे जर का ओबीसीमध्ये मराठ्यांना समाविष्ट करत असेल तर हा विषय नक्कीच लोकसभेत सुद्धा गाजल्याशिवाय राहणार नाही. असे देखील प्रतिभा धानोरकर
शंभर टक्के गॅरंटी, तिकीट तर मला मिळेलच
पक्षाकडून आदेश म्हणून नाही पण, आपल्याला माहित आहे की, या चंद्रपूर-वणी लोकसभा मतदार संघात दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचा हा मतदार संघ होता आणि अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव हा मतदार संघ काँग्रेसने राखला. त्याच्यामुळे पक्षाने आदेश जरी दिला नसेल तरी या लोकसभेची दावेदार म्हणून मी माझी पूर्वतयारी चालू केलेली आहे. पक्षाच्या वतीने तिकीट तर मला मिळेलच, हे शंभर टक्के गॅरंटी मला आहे. कारण दुसरा पर्यायी दावेदार कोणी नाही आणि हक्काची जागा असल्यामुळे ही जागा मी सोडणार नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य राहील, असे देखील धानोरकर म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
...तर OBC आरक्षणच रद्द होऊ शकते, मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये खळबळ