एक्स्प्लोर
Advertisement
युतीत 2014 ला जिंकलेल्या जागांवर चर्चा नाही, चर्चा फक्त सीटिंग व्यतिरिक्त उर्वरित जागांवर : चंद्रकांत पाटील
भाजप आणि शिवसेना दोघांचीही मानसिकता असल्याचं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या या विधानामुळं शिवसेना आणि भाजप फिफ्टी-फिफ्टी जागांचं गणित कसं साधणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूर : युतीच्या जागावाटपावर 2014 ला जिंकलेल्या जागांवर चर्चा होणार नाही, चर्चा फक्त सीटिंग व्यतिरिक्त उर्वरित जागांवर केली जाईल, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जागावाटपाबाबत बोलताना विद्यमान जागांव्यतिरिक्त चर्चा करण्याबाबत विधान केले होते.
नागपूरमध्ये आता चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा यावर शिक्कामोर्तब केले आहे. विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये जागा वाटपात एकमेकांच्या सीटिंग जागांना हात लावायचा नाही, ही भाजप आणि शिवसेना दोघांचीही मानसिकता असल्याचं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या या विधानामुळं शिवसेना आणि भाजप फिफ्टी-फिफ्टी जागांचं गणित कसं साधणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
ह्यावेळी जागा वाटप करताना एकमेकांच्या सीटिंग जागांना हात लावायचा नाही. ही भाजप आणि शिवसेना दोघांचीही मानसिकता आहे. त्यामुळे संख्यात्मक दृष्ट्या ह्यावेळी दोघांमध्ये वेगवेगळ्या भागात इम्बॅलन्स असू शकतो, असे पाटील म्हणाले.
आमचे 122 आमदार आणि आमच्यासोबत असलेले अपक्ष सहा आणि नव्याने आलेले चार असे 132 आमदार सीटिंग आहेत. मग आम्हाला 50 टक्के म्हणजे 135 जागा द्यायच्या म्हटल्यावर आणखी तीनच जागांवरच चर्चा होईल. याची जाणीव आम्हाला जशी आहे तशीच शिवसेनेला देखील आहे. जागावाटप करताना राज्यभरातील जागांचा एकूण विचार केला जाईल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
यावेळी पाटील म्हणाले की, जे 22 ते 25 वर्ष आधी स्कूटरवर फिरत होते ते आज 500-600 कोटीचे मालक आहेत. नेत्यांकडे हे पैसे कुठुन आले असा सवालही पाटील यांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जॅाब माझा
भविष्य
Advertisement