एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेसनं शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेलं :चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्यावधी निवडणुकांचं भाकित केलंय. सरकार नीट चालल्यास डिसेंबरमध्ये मध्यावधीचे संकेत पाटलांनी दिलेत. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पाटील यांनी शिवसेना आणि काँग्रेसवरही तोफ डागली.
पुणे : काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्त्वापासून दूर नेत आहे. शिवसेनेच्या बदल्यात मनसेला जागा करुन दिली जात आहे असा आरोप भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 'काँग्रेसने योग्य प्लॅन करुन शिवसेनेला हिंदुत्त्वापासून दूर नेलं. मी शिवसेनेचा हितचिंतक आहे. ते होते म्हणून मराठी माणूस, हिंदू माणूस वाचला. काँग्रेस तुम्हाला हिंदुत्वापासून दूर नेत आहे. त्याच्या बदल्यात मनसेला जागा करून दिली जात आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात हिंदुत्त्ववादी म्हणून मनसे आणि भाजपा येत आहे याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. हिंदुत्त्व सोडलं नसेल तर शिवेसेनेने राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) समर्थन द्यावं असं आव्हान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिलं. पुणे महानगरपालिकेत पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी चंद्रकांत पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे.
सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. पुढील सुनावणी 17 मार्चला होणार आहे या विषयी चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, मागास आयोगाची निर्मिती न झाल्याने ( राणे हे कमिशन नाही, कमिटी आहे) आम्ही मागास आयोगाची निर्मिती केली. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार इतिहासात मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार नोकऱ्या, वैद्यकीय जागांवर आरक्षण दिले गेले. त्यावर सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यास नकार, अंतीम सुनावणी 17 मार्चला आहे, तेव्हा तरी तयारी करावी अशी आज महाराष्ट्र सरकारने तयारी व्यवस्थित केली नाही. आम्ही उच्च न्यायालायलाची तयारी व्यवस्थित केली होती. नीट तयारी करून केस चालवली तर मराठा समाजाला कायमचे आरक्षण मिळेल. आज सरकारमध्ये असणाऱ्या काहींचा त्याला तात्विक विरोध आहे. त्यांनी वेळप्रसंगी विरोधकांना सामील करून घ्यावे. त्यासाठी शासनाने ठाम भूमिका घ्यावी.
Chandrakant Patil | हिंदुत्व सोडलं नसेल तर शिवसेनेनं NRCला समर्थन द्यावे : चंद्रकांत पाटील | ABP Majha
उद्धव ठाकरे म्हणाले की, नागरीकता संशोधन कायद्यात विरोध म्हणजे ' साप म्हणून भुई बडवण्यासारखे आहे'. ते आमच्याशी सहमत झाला असेल तर त्यांनी कायदा राज्यात अस्तित्वात आणावा आणि त्या विरोधात सुरू असणारी आंदोलने थांबायला हवीत. लहान शाळेतील मुले काही जण या कायद्याखाली आझादी म्हणत आहेत. काँग्रेसने प्लॅनिंगने शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेलं आहे. काँग्रेसने शिवसेनेला हिंदुत्वपासून दूर नेले. मी शिवसेनेचा हितचिंतक आहे. ते होते म्हणून मराठी माणूस, हिंदू माणूस वाचला. हा काँग्रेसचं शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेत आहेत. त्याच्या बदल्यात मनसेला जागा करून दिली जात आहे. त्यात तयार होणारी पोकळी त्यांना राज ठाकरेंच्या मनसेच्या रूपातून भरून काढली जाणार आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात हिंदुत्ववादी म्हणून मनसे आणि भाजप येत आहे याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावा. उद्धव ठाकरे वारंवार सांगतात की, मी हिंदुत्व सोडलेले नाही मग त्यांनी 7 मार्चला अयोध्येला जावे, सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी करावी.
देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार अशी कुठलीही चर्चा नाही. कोणी कुणाचा विश्वासघात केला हे लोकांना माहिती आहे. हे सरकार चाललं नाही आणि डिसेंबर आसपास मध्यावधी निवडणुका झाल्या तर लोक ठरवतील कोणी कुणाचा विश्वासघात केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रिकेट
शेत-शिवार
Advertisement