एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळांची माफी मागावी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी

"चंद्रकांत पाटलांनी तत्काळ आमचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची माफी मागावी. त्यांच्या बोलण्याचा जो रोख होतो, जो गर्व होता, तो जनता सहन करणार नाही, त्यामुळे तत्काळ भुजबळांची माफी मागावी.", अशी मागणी राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विजयी झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त करत भुजबळ यांनी धमकी दिली होती. आता याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ यांनी केली आहे. त्यासोबतच गोकुळ महासंघाच्या निवडणूकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचं पॅनल विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले की, "ममता दिदिंनी संघर्ष करुन पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला. 'मेरा पश्चिम बंगाल मैं नही दूंगी' असं म्हणत जखमी झालेली महिला देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री प्रचारात उतरलेले असतानाही त्यांनी विजय मिळवला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिलेली होती. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना राग येण्याची गरज नव्हती. ते पुढे जाऊन म्हणाले, भुजबळ तुम्ही जामिनावर आहात, तुम्ही निर्दोष सुटलेला नाहीत. अन्यथा तुमचा जामिन रद्द करु, अशा आशयाची प्रतिक्रिया देताना. आज भारतीय जनता पक्षाच्या हातात ईडी, सीबीआय, एनआयए आहे. आता कोर्टही यांच्या खिशात असल्यासारखं ही मंडळी बोलू लागली आहेत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "चंद्रकांत पाटलांनी तत्काळ आमचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची माफी मागावी. त्यांच्या बोलण्याचा जो रोख होतो, जो गर्व होता, तो जनता सहन करणार नाही, त्यामुळे तत्काळ भुजबळांची माफी मागावी."

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या नव्या दाव्यांवर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, "परमबीर सिंह प्रकरणी मी सातत्यानं सांगत आलोय की, मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटकं ठेवण्यात आली त्याचा मास्टर माईंड कोण? कशासाठी ठेवली? हे अजून एनआयएनं जाहीर केलेलं नाही. प्रसार माध्यमांनी अनेकदा सचिन वाझेंसोबतच परमबीर सिंह यांच्याकडे संशयाची सुई दाखवली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी परमबीर सिंहावर आरोप करत तक्रारी दाखल केल्या आहेत. तसेच एका क्रिकेट बुकीनं आपल्याकडून पैसे घेतल्याचाही आरोप परमबीर सिंहांवर केला आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांची तत्काळ चौकशी होण्याची गरज आहे."

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंहांची चौकशी करण्यासाठी असमर्थ असल्याचं सांगितलं आहे. त्यावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, "पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंहांची चौकशी करण्यास असमर्थ असल्याचं का सांगितलं मला कळत नाही, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावेल ही भिती आहे. असे अधिकारी मोकाट सुटलेले आहेत. यांनी ज्यावेळी 100 कोटींचा लेटरबॉम्ब टाकला, त्यावेळी सगळीकडे याचीच चर्चा होती. पण आता 1 हजार कोटींपेक्षा जास्त परमबीर सिंहांवर आरोप असूनही सर्व शांत का?", असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

रश्मी शुक्ला यांनी त्यांना पाठवलेल्या समन्स विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणीही हसन मुश्रीफ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "रश्मी शुक्ला या पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या गटात गेलेल्या अधिकारी आहेत. त्या फोन टॅपिंग करत होत्या आमदारांच्या, आमचे सहकारी यड्रावकर यांना 20 कोटींची लाच दाखवली होती." तसेच याप्रकरणी सरकारनं धोरण आखून चौकशी करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :28 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
Embed widget