(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrakant Patil Press : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी यादी पूर्ण : चंद्रकांत पाटील
राष्ट्रपती राजवट लावण्यासाठीची सगळी यादी पूर्ण झाली आहे. सगळी कारणं यांनी पूर्ण केली आहेत." अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर केली.
कोल्हापूर : "एक दोन नव्हे तर तीन परीक्षांचे पेपर फुटले आहेत. या सर्वांची पाळंमुळं राजकीय व्यक्तीपर्यंत पोहोचत आहेत. त्यावरून सीबीआय चौकशीची मागणी आम्ही लावून धरणार आहे. राज्यपालांनी एखादा निरोप पाठवला तर तुम्ही तो नाकारता. म्हणजे राज्यपालांचा तुम्ही अपमान करता. राष्ट्रपती राजवट लावण्यासाठीची सगळी यादी पूर्ण झाली आहे. सगळी कारणं यांनी पूर्ण केली आहेत." अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी महाविकास आघाडीवर केली.
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद (Chandrakant Patil Press ) घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. "जे जे त्रासदायी होईल ते यांना नको आहे. तपास यंत्रणा आणि भाजपचा कोणताही संबध नाही. लोक विचार करून आपलं मत ठरवतात. कोण आजारी आहे. कोण जेलमध्ये आहे. राज्यात सगळा गोंधळच सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेसमोर जा मग कळेल जनता कुणाला स्वीकारते?" असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला केले.
"अमित शाह गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आले होते. सहकारातील खूप कळणारा माणूस सहकार विभागाला मिळाला. त्यामुळे यापुढे सहकार वाढण्यास मदत होईल, असे सांगत चंदक्रांत पाटील म्हणाले, "कोणते उद्योग गुजरातमध्ये गेले याची सुभाष देसाई यांनी माहिती द्यावी. काही गेले असतील तर त्याची कारणं वेगळी असतील." असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत संपादक, संजय राऊत प्रवक्ते, संजय राऊत हेच सरकारचे प्रवक्ते. असेच पाहायला मिळत आहे. इतर सर्वांना बाजूला करण्यात आले आहे. त्यामुळे सेनेतील घुसपट बाहेर पडेल. आता माझ्या बोलण्यावरून उद्या सामनामधून टीका होणार यात शंका नाही." अशी कोपरखळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लावली.
त्यावेळी का विरोध केला नाही?
प्रचाराच्या पहिल्या सभेपासून देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील हे ठरलं होतं. ही माहिती आधीपासूनच होती तर त्यावेळी का विरोध केला नाही? असा प्रश्न यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
...तर भाजप उमेदवार मागे घेणार नाही
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व गटात उमेदवारी अर्ज भरले आहेत. दोन जागा मिळवल्याशिवाय भाजप आपले उमेदवार मागे घेणार नाही. असं नाही झालं तर सर्व जागांवर निवडणूक लढवली जाईल. असा इशारा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिला.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील? पाहा व्हिडिओ
महत्वाच्या बातम्या
Chandrakant Patil vs Girish Bapat : अमित शाह यांच्यासमोरच चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांच्यात शीतयुद्ध
चंद्रकांत पाटील यांचे अजब वक्तव्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बॅंक विकसित केली, वाजपेयी-मोदींकडून कळस!