एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दुर्दशा! ग्रंथालयातील हजारो पुस्तकं खराब, रद्दीत जमा!

University Of Mumbai : हजारो पुस्तक पूर्णपणे खराब झालीये, काही पुस्तकांना वाळवी लागली आहे,  तर अनेक पुस्तकं रद्दीत जमा करण्याच्या वेळ आलीये.

University Of Mumbai : मुंबईच्या कलिना विद्यापीठात ग्रंथालयाच्या आतील दुर्दशा पाहिली तर लक्षात येईल, मागील साठ-सत्तर वर्षांपासून जपलेल्या दुर्मिळ पुस्तकांचा विद्यापीठाच्या ग्रंथालयतील खजिना पूर्णपणे खराब झालाय. हजारो पुस्तक पूर्णपणे खराब झालीये, काही पुस्तकांना वाळवी लागली आहे, तर अनेक पुस्तकं रद्दीत जमा करण्याच्या वेळ आलीये.

ग्रंथालयातील मराठी भाषा विभाग हा मागील चार वर्षापासून पूर्णपणे बंद होता या मराठी पुस्तकांची अवस्था सुद्धा इतर पुस्तकाप्रमाणेच झालीये. यावर युवासेना सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी विद्यापीठात ग्रंथालयाची दुरावस्था पाहून पुस्तकांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचं सांगून याबाबत विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने ग्रंथालयाचे सद्यस्थिती ग्रंथालयांमध्ये असलेल्या पुस्तकांच्या संदर्भात खुलासा केला आहे

विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची इमारत ही १९७५ ला तयार करण्यात आली होती. या ज्ञान स्त्रोत केंद्राची (विद्यापीठ ग्रंथालय) ग्रंथ संपदा ७,८०,००० एवढी आहे. या ग्रंथालयात काही देणगीदारांनी त्यांच्याकडे जागा नसल्याने व त्यांच्या उपयोगाची नसलेली अनेक ग्रंथ, वर्तमानपत्रे देणगी म्हणून दिलेली होती. तसेच काही पुस्तके विक्री अभावीही मोठ्या प्रमाणात या ग्रंथालयात ठेवण्यात आली आहेत.

या ग्रंथालयातील अनेक पुस्तके ही जीर्ण आणि कालबाह्य झालेली आहेत. जीर्ण आणि कालबाह्य झालेली पुस्तके ही वेगळी करून रद्दबाबत करण्याची प्रक्रीया सुरू आहे. तसेच अनेक महत्वाच्या पुस्तकांचे डीजीटायझेशन करण्याच्या उद्देश्याने रोबोटिक स्कॅनरद्वारे स्कॅनिंगची प्रक्रीया लवकरच हाती घेण्यात येणार आहे. उपयोगी नसलेली पुस्तके रद्दीमध्ये काढण्यासाठी गोणीत भरली असून रद्दीत विकण्याची प्रक्रीयाही सुरु आहे.

या ग्रंथालय ईमारतीचे बांधकाम जुने असल्याने कालपरत्वे या इमारतीचे आयुमान कमी झाल्याने विद्यापीठाने या इमारतीचे सुरक्षिततेच्या अनुषंगाने स्ट्रक्चरल ऑडिट केले असून टप्प्या टप्प्याने  कामे हाती घेण्यात आली आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर व प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी वेळोवेळी या ग्रंथालयाच्या इमारतीला भेटी देऊन कामाची पाहणी केली आहे. तसेच विद्यापीठ अभियंता, संबंधित कंत्राटदारांना कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. तसेच पुढे असेही नमूद करण्यात येते की, विद्यानगरी परिसरात नवीन ग्रंथालय इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून काही किरकोळ कामे व ओसी प्राप्त होताच मार्च अखेरीस नवीन ग्रंथालयाची इमारत वापरासाठी खूली होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यशEknath Shinde Ghatkopar : घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना, पालघरची  सभा आटपून एकनाथ शिंदे घटनास्थळीGhatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
Embed widget