एक्स्प्लोर

Maratha Reservation : 'केंद्र सरकारच्या पुढाकाराचे स्वागत, राज्य सरकार दिशाभूल करतंय', भाजपची प्रतिक्रिया

Maratha Reservation : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. तशीही ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी सुद्धा मान्य केलेलीच आहे. तातडीने ही फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

Maratha Reservation :  मराठा आरक्षणाबाबत 102 वी घटना दुरुस्ती संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिलेल्या निकालावर केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. राज्यांना ओबीसी लिस्टमध्ये समावेशाचे अधिकार नाहीत अशा पद्धतीचा निर्णय खंडपीठाने दिला होता. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली.या आयोगाच्या स्थापनेनंतर राज्यांना आरक्षणाचे अधिकार आहेत की नाहीत याबाबत बराच उहापोह झाला होता.  खंडपीठाने हे अधिकार आता राज्यांना उरले नसल्याचा निर्वाळा दिला होता. पण केंद्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करून या निर्णयाला आव्हान देत आहे. म्हणजे एक प्रकारे राज्यांना हे अधिकार आहेत असं केंद्राचं सांगणं आहे.

फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार -देवेंद्र फडणवीस 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात म्हटलं आहे की, 102 व्या घटना दुरुस्तीनंतर एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारांना नाहीत, असा चुकीचा अर्थ काढला जात होता. वस्तुतः केंद्र सरकारने आधीपासूनच ही भूमिका घेतली होती की, हे अधिकार राज्यांनाच आहेत आणि ते केंद्राने स्वतःकडे घेतलेले नाहीत. आधी उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा केंद्र सरकारने हीच भूमिका घेतली. आम्ही सुद्धा वारंवार हेच सांगत होतो. आता केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. तशीही ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी सुद्धा मान्य केलेलीच आहे. तातडीने ही फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी योग्य पावलं उचलावीत, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना पत्रातून विनंती

मराठा आरक्षणास मोठी मदत मिळेल- चंद्रकांत पाटील 

केंद्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असून 102 व्या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांना एखाद्या जातीला मागास म्हणून आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचे ठाम प्रतिपादन केले आहे. केंद्र सरकारच्या या पुढाकाराचे आपण स्वागत करतो, मराठा आरक्षणास त्यामुळे मोठी मदत मिळेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केले. पाटील यांनी सांगितले की, 102 व्या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांचे एखाद्या जातीला मागास म्हणून आरक्षण देण्याचे अधिकार अबाधित आहेत, असे केंद्र सरकारने स्पष्टपणे मराठा आरक्षणावरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. महाराष्ट्राच्या मराठा आरक्षणाच्या कायद्याच्या बाजूने केंद्र सरकारची ही भूमिका होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात मात्र तीन विरुद्ध दोन अशा न्यायमूर्तींच्या मताने १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर हा अधिकार केंद्र सरकारला असल्याचा निर्णय दिला होता. तथापि, केंद्र सरकारने या संदर्भात तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे व राज्यांचा अधिकार अबाधित असल्याचा आग्रह धरला आहे, हे स्वागतार्ह पाऊल आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवा मागासवर्ग आयोग स्थापन करण्याची शक्यता, सरकारी हालचालींना वेग

ते म्हणाले की, मराठा आरक्षण कायदा अवैध ठरण्यासाठी महत्त्वाच्या तीनपैकी एक मुद्दा १०२ व्या घटनादुरुस्तीचा ठरला होता. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या पुनर्विचार याचिकेतील भूमिका मान्य करून राज्यांचा अधिकार अबाधित असल्याची भूमिका अंतिम निकालात घेतली तर महाराष्ट्र राज्याला मराठा आरक्षणाबाबत मोठा दिलासा मिळेल. राज्य सरकारनेही वेळ वाया न घालविता मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे. केंद्र सरकारच्या याचिकेच्या आधारावर राज्याला पुनर्विचार याचिकेत अधिक चांगल्या रितीने बाजू मांडता येईल.

Maratha Reservation : 'केंद्राने कातडी बचाव धोरण स्वीकारु नये', फेरविचार याचिकेवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्यास पुढाकार घेण्याच्या ऐवजी निकालाचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमून त्यावर किमान पंधरा दिवस खर्च करण्याचा पवित्रा घेतला आहे. केंद्र सरकारचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आणि राज्याचा मराठा आरक्षणाचा अधिकार अबाधित राहिला तरी गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारला जाण्याबद्दल उपाय करावा लागेल. एक तर पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून या मुद्द्यावर अनुकूल आदेश मिळवावा लागेल किंवा राज्य सरकारला मराठा समाज मागास असल्याचा नव्याने अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाकडून घ्यावा लागेल. त्यासाठी मुळात मागासवर्ग आयोग स्थापन करावा लागेल. आघाडी सरकार मराठा आरक्षण टिकविण्यासाठी कोणतेही अर्थपूर्ण कायदेशीर पाऊल उचलण्याच्या ऐवजी राज्यपालांना निवेदन देण्यासारख्या प्रकारांनी केवळ समाजाची दिशाभूल करत आहे, असे त्यांनी निदर्शनाला आणले.

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सध्या मराठा समाजाला आरक्षण नाही. वैधानिक प्रक्रिया पूर्ण होऊन ते पुन्हा मिळण्यास काही वर्ष लागू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला जशा सवलती दिल्या होत्या तशा ओबीसींप्रमाणे सवलती ताबडतोब सुरू कराव्यात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : गितेंची डोकेदुखी वाढणार! दिंडोरी लोकसभेसारखाच बसणार फटका? नाशिक मध्य मतदारसंघात घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?
गितेंची डोकेदुखी वाढणार! दिंडोरी लोकसभेसारखाच बसणार फटका? नाशिक मध्य मतदारसंघात घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?
Ajit Pawar NCP Candidates List: टिंगरेंना वडगाव शेरीतून, शिरुर हवेलीतून माऊली खटके रिंगणात, अजित पवार गटाची दुसरी उमेदवारी यादी जाहीर
टिंगरेंना वडगाव शेरीतून, शिरुर हवेलीतून माऊली खटके रिंगणात, अजित पवार गटाची दुसरी उमेदवारी यादी जाहीर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: रोहित पाटलांना मतदारसंघात काम कसं करायचं माहिती नाही, मला त्यांचं आव्हानच वाटत नाही; संजयकाका पाटलांची घणाघाती टीका
अजितदादा गटात प्रवेश करताच संजयकाका रोहित पाटलांवर तुटून पडले, म्हणाले, ते कॅमेराजीवी...
Dilip Sopal Net Worth: पाच लाखांची रिव्हॉल्व्हर, 12 लाखांचे दागिने; माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या संपत्तीत 'इतक्या' कोटींची वाढ
पाच लाखांची रिव्हॉल्व्हर, 12 लाखांचे दागिने; माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या संपत्तीत 'इतक्या' कोटींची वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare : राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरेंना वडगाव शेरीतून उमेदवारीRamtek Vishal Barbate : उद्धव ठाकरेंचा रामटेकमध्ये सांगली पॅटर्नTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSudhir Mungantiwar Nagpur : चंद्रपुरात आयात उमेदवारांना प्राधान्य दिल्याने मुनगंटीवारांची नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : गितेंची डोकेदुखी वाढणार! दिंडोरी लोकसभेसारखाच बसणार फटका? नाशिक मध्य मतदारसंघात घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?
गितेंची डोकेदुखी वाढणार! दिंडोरी लोकसभेसारखाच बसणार फटका? नाशिक मध्य मतदारसंघात घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?
Ajit Pawar NCP Candidates List: टिंगरेंना वडगाव शेरीतून, शिरुर हवेलीतून माऊली खटके रिंगणात, अजित पवार गटाची दुसरी उमेदवारी यादी जाहीर
टिंगरेंना वडगाव शेरीतून, शिरुर हवेलीतून माऊली खटके रिंगणात, अजित पवार गटाची दुसरी उमेदवारी यादी जाहीर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: रोहित पाटलांना मतदारसंघात काम कसं करायचं माहिती नाही, मला त्यांचं आव्हानच वाटत नाही; संजयकाका पाटलांची घणाघाती टीका
अजितदादा गटात प्रवेश करताच संजयकाका रोहित पाटलांवर तुटून पडले, म्हणाले, ते कॅमेराजीवी...
Dilip Sopal Net Worth: पाच लाखांची रिव्हॉल्व्हर, 12 लाखांचे दागिने; माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या संपत्तीत 'इतक्या' कोटींची वाढ
पाच लाखांची रिव्हॉल्व्हर, 12 लाखांचे दागिने; माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या संपत्तीत 'इतक्या' कोटींची वाढ
Rajan Vichare Property : कोट्यवधींची संपत्ती, आलिशान गाड्या, लोकसभेनंतर डोक्यावरील कर्ज वाढलं, राजन विचारेंची संपत्ती नेमकी किती?
कोट्यवधींची संपत्ती, आलिशान गाड्या, लोकसभेनंतर डोक्यावरील कर्ज वाढलं, राजन विचारेंची संपत्ती नेमकी किती?
रायगडच्या तीन जागांवर मविआचे दोन उमेदवार; अलिबागमध्ये तिहेरी, तर पेणमधून एकेरी लढतीची शक्यता
रायगडच्या तीन जागांवर मविआचे दोन उमेदवार; अलिबागमध्ये तिहेरी, तर पेणमधून एकेरी लढतीची शक्यता
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Embed widget