केंद्र सरकार राजकारणासाठी ईडीचा वापर करत आहे : रोहित पवार
ईडीने भाजपच्या एकाही नेत्यावर कारवाई केलीली नाही. ईडीकडून केवळ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई केली जात आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
जळगाव : ईडीची नोटीस आतापर्यंत कोणत्याही भाजप नेत्याला आलेली नाही. ती अन्य पक्षातील नेत्यांनाच म्हणजे पवार साहेबांना आणि शिवसेनेच्या आमदारांना आलेली असल्याच पाहायला मिळालं आहे. या सर्वांचा अभ्यास केला तर केंद्र सरकार ईडीचा वापर हा राजकरणासाठी तर करत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याचा वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. रोहित पवार आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. डॉ. भुषण मगर यांच्या विघनहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि युवकांशी संवाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना बोलत होते.
राजकारणात आल्यावर 50 टक्के केस पांढरे झालेजनतेचे प्रश्न सोडवत असताना स्वतःच्या विचार न करता जनतेचे प्रश्न सोडवण्याला पहिले प्राधान्य द्यावे लागते. त्याला वेळ द्यावा लागतो. या गोष्टी करत असताना अनेक वेळा तणावाला सामोरं जावे लागते. पूर्वी सारखं राजकारण आता सोपं राहिलं नसल्याने सध्या राजकारणात मोठा ताणतणाव असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकारणात आल्यावर 50 टक्के केस पांढरे झाले असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
युवकांमध्ये मोठी ताकद आहे. या ताकदीला जर आपण दिशा देऊ शकलो नाही तर ही ताकद वाया जाऊ शकते आणि चुकीच्या मार्गाने लागली तर मोठ्या प्रमाणावर अडचणी येऊ शकतात. युवकांना ताकद देण्यासाठी आघाडी सरकार सर्व प्रयत्न करत आहे. मात्र यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे. युवकांनी आपला वापर कुणी करून घेणार नाही याची काळजी घ्यायला हवी असा सल्लाी रोहित पवार यांनी दिला. संबंधित बातम्या