CBSE Board Exams Date: 26 एप्रिलपासून सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा ; शेवटच्या आठवड्यात लेखणाचा सराव महत्वाचा, तज्ज्ञांचा सल्ला
CBSE Board Exams Date : CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहेत. CBSE बोर्डाची 10वीची परीक्षा 24 मे पर्यंत, तर 12वीची परीक्षा 15 जून 2022 पर्यंत चालणार आहे.
CBSE Board Exams Date : सीबीएसई ( CBSE) च्या दुसऱ्या टर्मच्या परीक्षा (Exams) सुरू होण्यासाठी फक्त 10 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहेत. CBSE बोर्डाची 10वीची परीक्षा 24 मे पर्यंत, तर 12वीची परीक्षा 15 जून 2022 पर्यंत चालणार आहे. या परीक्षेसाठी तज्ज्ञांनी काही सल्ले दिले आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना लिखाणाची सवय नाही. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी लिखाणाचा सराव करणे खूप आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
CBSE बोर्डाच्या परीक्षा 2022 पूर्वी वर्षातून एकदाच होत होत्या. परंतु, यावेळी देशभरातील कोरोनाची परिस्थिती पाहता सीबीएसई बोर्डाकडून ही परीक्षा दोन टर्ममध्ये घेतली जात आहे. CBSE टर्म 1 ची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये झाली आहे. विद्यार्थ्यांनी तब्बल दोन वर्षांनी लेखी परीक्षा दिली होती, त्यामुळे या परीक्षेची पद्धत वस्तुनिष्ठ ठेवण्यात आली होती.
येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी लिखाणाचा सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी लेखणाच्या सरावासह वेळेचे नियोजन केले पाहिजे. विद्यार्थ्यांना या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर त्यासाठी लेखन हा खूप महत्वाचा भाग आहे. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षण झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडली आहे. त्यामुळे या परीक्षेत जास्त गुण मिळवायचे असतील तर विद्यार्थ्यांनी लिखाणाचा सराव करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
ऑफलाइन शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास आणि गृहपाठ दिला जातो. त्यामुळे त्यांचा लेखनाचा पुरेसा सराव होतो. शिवाय शाळेत घेण्यात येणाऱ्या नियमित चाचण्यांमुळे विद्यार्थ्यांना लिखाणासाठी वेगळा असा सराव करावा लागत नाही. बोटांच्या आणि हातांचा स्नायूंना सवय होण्यासाठी लेखणाचा नियमित सराव आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी सलग दोन-तीन तास लिखाण केले तरी त्याचा कोणताही त्रास होणार नाही. याबरोबरच परीक्षेत चांगले गुण मिळवू शकत नसलेल्या आणि अभ्यासात कमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लिखाणाचा वेग फार महत्वाचा आहे. एवढेच नाही तर या वेगासह अचूक लिहिणेही खूप महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना दोन तासांत 40 गुणांचा पेपर पूर्ण करायचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना राहिलेल्या दिवसांत लिखाणाचा सराव करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
महत्वाच्या बातम्या
CBSE विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; पुढील वर्षापासून 10वी, 12वीची परीक्षा एकदाच होणार
NEET 2022 Date : 17 जुलैला 'नीट' परीक्षा, तर 6 मेपर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI