एक्स्प्लोर
सुरेश धस यांच्या तक्रारीनंतर प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडितांवर गुन्हा
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित नेते सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमरसिंह पंडित आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्याविरोधात बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश सोळंके आणि अमरसिंह पंडित यांनी पत्रकार परिषदेत सुरेश धस आणि त्यांच्या पत्नीवर वैयक्तिक पातळीवर टीका केली होती. त्यानंतर प्राजक्ता धस यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हेतू पुरस्पर जनमानसात प्रतिष्ठा मालिन करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरेश धस गटाने भाजपला मदत केल्यानंतर धस यांना राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात धस यांनी राष्ट्रवादीच्या बीड जिल्ह्यातील काही नेत्यांवर टीका केली होती.
सुरेश धस यांच्या मेळाव्यानंतर प्रकाश सोळंके आणि अमरसिंह पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांच्या टीकेला उत्तर दिलं होतं. मात्र यावेळी त्यांनी आपल्यावर वैयक्तीक पातळीवर टीका केल्याची तक्रार प्राजक्ता धस यांनी दिली.
संबंधित बातमी :
कार्यकर्ता मेळाव्यात सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
कानफुक्यांनी निलंबनाची कारवाई केली : सुरेश धस
सुरेश धस यांचं राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
स्वतःच्या रक्ताचे झाले नाहीत, त्यांनी विश्वासघातकी म्हणू नये : धस
सुरेश धस यांच्या स्वभावातच विश्वासघातकीपणा, धनंजय मुंडेंची टीका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
वर्धा
भारत
Advertisement