काँग्रेसच्या माजी आमदारासह तिघांवर गुन्हा दाखल, कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
कर्मचाऱ्याला धमकी आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली काँग्रेसचे माजी आमदार संजय दत्त यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दत्त यांच्याबरोबरच अन्य तिघांविरोधातही गुन्हा दाखल झालाय.
Mla Sanjay Dutt : गॅस सिलेंडर वितरणाचे काम करणाऱ्या दिपक निकाळजे या तरूणाला धमकी आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली काँग्रेसचे माजी आमदार संजय दत्त यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दत्त यांच्याबरोबरच अन्य तिघांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुला घरातून उचलून घेऊन जाईल, तू माझे भीषण रूप पाहिलेले नाही, मी कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी धमकी दत्त यांनी मोबाईलवरून दिल्याचा आणि दत्त यांच्या सांगण्यावरून तीन अनोळखी व्यक्तींनी रॉडने मारहाण केल्याची तक्रार निकाळजे यांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी दत्त यांनी धमकावल्याची ऑडियो क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
दरम्यान, माजी आमदार संजय दत्त यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. आरोप करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गंभीर प्रकारची तक्रार आल्याने त्याला कामावरुन काढण्यात आले आहे. या रागापोटी त्याने पोलिसात खोटी तक्रार केली आहे. संजय दत्त यांनी फोनवरुन रागात बोलल्याचे मान्य केले. मात्र, मारहाण केल्याचा आरोप फेटाळला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यावर एफआरआय दाखल करा अशी मागणी संजय दत्त यांनी केली आहे.
डोंबिवली पूर्व भागातील टाटा पॉवर देशमुख होम्स परिसरात राहणारा दीपक निकाळजे हा व्यक्ती एका गॅस एजेन्सीत काम करतो. रविवारी रात्री घरी जात असताना दीपकला तीन जणांनी अडवले. त्याला बेदम मारहाण केली. दीपकवर डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दीपक काँग्रेसचे नेते संजय दत्त यांच्या शक्ती गॅस एजन्सीमध्ये काम करीत होता. त्याठिकाणी त्याला पगार व्यवस्थित मिळत नसल्याने मी अन्य ठिकाणी काम करत होतो. रविवारी सकाळी संजय दत्त यांनी फोन करत मला धमकी दिली. दत्त यांनी माझ्या माणसांना भडकवण्याचे धंदे बंद कर, नाहीतर मी घरी येऊन येऊन उचलून नेईल. अजून तू माझें रौद्र रुप बघितले नाही अशी धमकी दत्त यांनी दिल्याचा आरोप केला. या दमबाजीचे मोबाईल रेकॉडिंगही दीपककडे आहे. निकाळजे यांच्या तक्रीरीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी संजय दत्त यांच्यासह 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना संजय दत्त यांचे मोबाईलवरील संभाषण सुद्धा सूपूर्द केले आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहे.
माझ्या विरोधात अत्यंत खोटे दिशाभूल करणारे रोप आहेत. मला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचे संजय दत्त यांनी सांगितले. ज्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केले आहेत. त्याच्या विरोधात ग्राहकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. तो गॅस सिलिंडर ब्लॅकने विकत होता. महिला ग्राहकांसोबत उद्धट भाषेने बोलत होता. इतकेच नाही तर माझ्या कर्मचाऱ्यांना भडकावित होता. त्यामुळे आम्ही त्याला कामावरून काढून टाकले. हा कर्मचारी सातत्याने माझ्या इतर कर्मचाऱ्यांना भडकत होता. त्यामुळे रविवारी त्याच्यासोबत मी फोनवर बोललो, मी त्याला रिक्वेस्ट केली. मात्र, उत्तेजीत होऊन मी काही शब्द बोललो. मारहाणीशी माझा काहीही संबध नाही. याआधीही माझ्या विरोधात खोटी तक्रार केली होती. ती तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातही पोलिसांनी सखोल तपास करुन खोटी तक्रार दाखल करणाऱ्या कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी माझी मागणी असल्याचे दत्त म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: