मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह ट्वीट, एकावर गुन्हा दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करणे चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी प्रदीप भालेराव यांच्यावर मुंबईतील समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
![मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह ट्वीट, एकावर गुन्हा दाखल case has been registered against one for posting offensive tweets against Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह ट्वीट, एकावर गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/25/14125760079507b33700d38ed576eec71666696493443328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट ( tweet) केल्याप्रकरणी मुंबईतील समता नगर पोलिसांनी रविवारी एकावर गुन्हा दाखल केला आहे. प्रदीप भालेकर असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. भालेकर यांनी ट्वीटरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रदीप भालेकर यांनी 23 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विविध आरोप केले आहेत. तसेच शिंदे व फडणवीस यांनी आपल्याला ठार मारण्याचा कट रचला आहे. तसेच काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्येबाबतही खळबळजनक वक्तव्य ट्वीटमध्ये करण्यात आले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, भालेकर यांनी देखील ट्विटरवरून आपल्यावर गुन्हा का दाखल झाला याबाबत माहिती दिली असून. याबरोबरच पोलिस आपल्या आईला आणि बहिणीला त्रास देत असल्याचा आरोप भालेकर यांनी त्यांच्या ट्विटरून केला आहे.
मी "प्रदीप भालेकर".याच कारणामुळे आता "मुख्यमंत्री-एकनाथ शिंदे" आणि "उपमुख्यमंत्री -देवेंद्र फडणवीस,नारायण राणे" यांनी मला पोलिसांकडून एन्काऊंटर करण्याचा प्लॅन आखला आहे."धर्मवीर-आनंद दिघसाहेबांचे मारेकरी आणि "नरेंद्र दाभोलकर" सरांचे मारेकरी देवेंद्र फडणवीसांच्या छत्रछायेखाली आहेत. pic.twitter.com/1AgJyu8PBt
— Pradeep Bhalekar (@PradeepBhaleka7) October 22, 2022
सायबर पोलिसांची तक्रार
भालेरवा यांनी केलेले ट्वीट आक्षेपार्ह वाटल्यामुळे सायबर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार केली. याप्रकरणी समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
...त्यामुळे गुन्हा दाखल
दोन गटांमध्ये वाद निर्माण करणे, सामाजिक शांतता बिघडवण्याच्या उद्देशाने वक्तव्य करणे, या कारणांमुळे प्रदीप भालेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
या पूर्वीही गुन्हा दाखल
यापूर्वी देखील राज्यपालांविरोधात बदनामीकारक ट्वीट केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने भालेकर विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर देखील आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
Crime News : मृत महिलेची संपत्ती लुबाडण्याचा डाव; मन्नत बाबासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)