Budget 2021 | मोफत कोरोना लसीसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मागणी
Union Budget 2021 : केंद्र सरकारने देशभर मोफत लसीकरण करावं हे अपेक्षितच आहे आणि ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची तरतूद जरुर करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केलं.
Union Budget 2021 : जालना : कोरोनाची लस मोफत मिळावी अशी मागणी राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारकडे केली आहे. दरम्यान उद्याच्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. दरम्यान मोफत लसीसाठीची तयारी केंद्रात सुरू असून या संदर्भात उद्या बजेटमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना राजेश टोपे यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
लसीकरणाचा कार्यक्रम हा केंद्र सरकारचाच असतो. देशस्तरावर केंद्र सरकारने राबवायचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभर मोफत लसीकरण करावं हे अपेक्षितच आहे आणि ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. उद्या देशाचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे, यामध्ये मोफत लसीकरणाची तरतूद जरुर करावी. ज्या ज्या लोकांना लसीकरण करणे आवश्यक आहे, त्यांचं लसीकरण करण्याची तरतून केंद्र सरकारने करावी, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.
Budget 2021: बजेटमध्ये कोरोना लस सरकारने विनामूल्य जाहीर करावी का?
कोरोना लसीकरणाची सद्यस्थिती
देशभरात आतापर्यंत एकूण 37 लाख 44 हजार 334 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 69 हजार 64 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. देशभरात गेल्या 24 तासात 2,44,307 आरोग्य कर्मचाऱ्यांना 5,275 केंद्रांवर लस देण्यात आली आहे. देशभरात लसीकरण मोहिमेच्या लसींच्या संख्येच्या बाबतीत जागतिक स्तरावर, भारत पाचव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे अनेक देशांच्या लसीकरण मोहिमेची सुरुवात भारताच्या अगोदरच झाली आहे.