Breaking News LIVE : राज्यात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा
Breaking News LIVE Updates, 5 Septembe 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित सर्व बातम्या केवळ एका क्लिकवर...
LIVE
Background
मागील काही दिवसांपासून सातत्यानं केंद्राकडून इम्पिरिकल डेटा मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र तो अद्याप मिळालेला नाही. 4 मार्चला सुप्रीम कोर्टात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत निर्णय आलेला आहे. कोर्टानं तत्काळ इम्पिरीकल डेटा सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. मात्र आद्यप इम्पिरिकल डेटा सरकारनं गोळा केला नाही. त्यामुळं राज्य सरकार ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण कसं टिकवणार? हा प्रश्न आहे. जर ओबीसी समाजाचं स्थानिक स्वराज संस्थांमधील राजकीय आरक्षण टिकवायचं असेल तर इम्पिरिकल डेटा तत्काळ उपलब्ध करावा. अन्यथा राज्यातील 56 हजार स्थानिक स्वराज संस्थांमधील उमेदवारांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं केंद्राकडं डेटा मागत बसू नये तत्काळ राज्यात आयोगाला आर्थिक मदत देऊन ओबीसी आरक्षण पूर्ववत करावं, अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.
याबाबत अधिक बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, "ओबीसी आरक्षण थांबलं आहे ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने थांबलं आहे. कोर्टाचा निकाल येऊन आता 6 महिने झाले आहेत. त्यामध्ये कोर्टानं स्पष्ट नमूद केलं आहे की, एक आयोग नेमा आणि त्यांच्याकडून डेटा गोळा करा. हे सहा महिने झाले तरी यांनी काहीच केलं नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे केंद्राकडे मागत बसण्यापेक्षा तत्काळ राज्यानं डेटा गोळा करायला सुरुवात करा."
सहाय्यक आयुक्त पिंपळे हल्ला प्रकरण; आरोपीला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी
मानपाडा-माजिवडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर आणि सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर चाकूनं जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपी अमरजीत यादव याला शनिवारी कासारवडवली पोलिसांनी ठाणे न्यायालयात हजार केलं. यावेळी ठाणे न्यायालयाने यादव याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अटकेतील आरोपी अमरजीत यादव याला कासारवडवली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयानं दिली होती. शनिवारी कोठडीची मुदत संपल्यानं पुन्हा ठाणे न्यायालयात हजार केल्यानंतर पोलिसांच्या पोलीस कोठडीवर आरोपीचा तपास पूर्ण झाला असून त्यानं गुन्ह्यात वापरलेले हत्यार चाकू हाही पोलिसांनी जप्त केल्यानं ठाणे न्यायालयानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी अमरजीत यादव याची ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आरोपी अमरजीत यादव याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणं, प्राणघातक हल्ला करणं अशा कलमांतर्गत नोंद करण्यात आलेली होती.
सोलापुरात दुसऱ्या दिवशी ही मुसळधार पाऊस, शहरासह आसपासच्या तालुक्यातही पाऊस
सोलापुरात दुसऱ्या दिवशी ही मुसळधार पाऊस, शहरासह आसपासच्या तालुक्यातही पाऊस, जवळपास अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस
राज्यात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचे इशारा
राज्यात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचे इशारा आज IMD ने परत दिले आहेत. खास करून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा प्रभाव सर्वदूर असेल. 7-8 ला कोकण, मध्य महाराष्ट्र तिव्रता जास्त सोबत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागीरी ओरेंज इशारा.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजू शेट्टी यांना बैठकीचे निमंत्रण, उद्या 3 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक होणार
राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजू शेट्टी यांना बैठकीचे निमंत्रण, उद्या 3 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक होणार
राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल
राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल. नृसिंहवाडी इथं इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात पोहचले..
सांगली, जिल्हा आणि कर्नाटकातील काही पुलांमुळे पूर यायला लागला
LIVE | राजू शेट्टी लाईव्ह
- सांगली, जिल्हा आणि कर्नाटकातील काही पुलांमुळे पूर यायला लागला
- यावर कायम स्वरूपी उपाय करणे गरजेचं आहे
- काही मंत्र्यांनी भिंत बांधण्याची कल्पना मांडली, पण ते शक्य होईल असं वाटत नाही