Breaking News LIVE : माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात साक्ष घेण्यासाठी मुख्य सचिव सिताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयकडून चौकशीसाठी बोलावणं
Breaking News LIVE Updates, 30 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Corona vaccination: देशातील 25 टक्के लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस, 2 ऑक्टोबरला मुलांसाठीची लस येण्याची शक्यता
Corona vaccination: कोरोना व्हायरसच्या (Corona virus) तिसऱ्या लाटेची (Third wave) शक्यता व्यक्त केली जात असताना भारतात आता कोरोना लसीकरणानं चांगलाच जोर धरला आहे. भारतात एकूण लोकसंख्येच्या जवळपास 25 टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण डोस दिलेल्या लोकांची संख्या 88 कोटींवर पोहोचली आहे. दुसरीकडे कोरोनाची आणखी एक लस 2 ऑक्टोबर रोजी मिळेल अशी शक्यता आहे. देशातील चार मोठ्या राज्यांपैकी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातनं 6 कोटींहून अधिक लोकांना लस दिली आहे. यात गुजरात (40 टक्के), मध्य प्रदेश (27 टक्के) आणि महाराष्ट्र (26 टक्के) लसीकरण झालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये 13.34 टक्के युवकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.
Mumbai School : शाळांची घंटा वाजणार! मुंबईतील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु
Mumbai School Reopening : तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेल्या मुंबईतील शाळा आता 4 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील महानगरपालिका शाळा, खाजगी व्यवस्थापन, इतर सर्व मंडळाच्या शाळांना आठवी ते बारावी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून आयुक्तांपुढे मांडण्यात आला होता. त्याला बीएमसी आयुक्त इकबाल सिंग चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) यांची मंजुरी मिळाली आहे. मुंबई परिक्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या एकूण शाळा 2553 आहेत आणि त्यात एकूण विद्यार्थी 5, 13, 502 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शेतकरी संकटात! राज ठाकरे म्हणाले, ही आणीबाणीची वेळ, ओला दुष्काळ जाहीर करा
Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada Rain Update) राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे. गुलाबी वादळामुळं झालेल्या पावसानं काटे मात्र शेतकऱ्यांच्या अंगाला रुतले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्रक काढत शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी सरकारकडे केली आहे. राज ठाकरे यांनी पत्रकात म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात, पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
एका कार चालकाने काळजी न घेता भरधाव वेगात कार ला यूटर्न मारल्याने झालेल्या अपघात दुचाकी स्वारसह दोघांना आपले प्राण गमवावे लागले
एका कार चालकाने काळजी न घेता भरधाव वेगात कार ला यूटर्न मारल्याने झालेल्या अपघात दुचाकी स्वारसह दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहे. घटना काल रात्री 10 वाजून 50 मिनिट ची आहे. लोअर परेल येथील सेनापती बापट मार्गावर फिनिक्स मॉल समोरील ब्रिजवर दादरकडून रखंगी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या कारने अचानक भरधाव वेगात यूटर्न मारला. यामुळे दादरकडे जाणाऱ्या दुचाकीवरील भावेश संघवी आणि कृष्णा कुराडकर यांची दुचाकी त्या कारला धडकली. सुमारे 20 ते 25 फूट पुढे हे दुचाकी स्वार फेकले गेले आणि समोर येणारे दुचाकीस्वार अशफाक मूलतानी यांच्या दुचाकीलालीही धडकले. यात भावेश आणि कृष्णा यांचा मृत्यू झाला असून अशफाक जखमी आहे. या घटनेला जबाबदार मोटार चालक मात्र भरधाव वेगात पळून गेला असून एन एम जोशी पोलीस या कार चालकाचा शोध घेत आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात साक्ष घेण्यासाठी मुख्य सचिव सिताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयकडून चौकशीसाठी बोलावणं
माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात साक्ष घेण्यासाठी मुख्य सचिव सिताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयकडून चौकशीसाठी बोलावणं.
विदर्भ मराठवाडा यांना जोडणाऱ्या पुलावरून 35 तासानंतर वाहतूक सुरू
यवतमाळ : विदर्भ मराठवाडा यांना जोडणाऱ्या पुलावरून 35 तास नंतर वाहतूक सुरू पैनगंगा नदीला पूर असल्याने आणि नदीवरील पुलावरून पाणी असल्याने 35 तास पासून वाहतूक थांबली होती. उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव जवळ मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागल्या होत्या साधारण 35 तास नंतर वाहतूक सुरू झाली. तर आज नुकसान ग्रस्त भागात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली पाहणी जिल्ह्यात गेल्या 6 दिवसापासून पाऊस सुरू होता त्यामुळे जिल्ह्यातील उमरखेड, महागाव , पुसद तालुक्यात शेतीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं त्यामुळे शेतकरी हैराण झाले असून मानसिकदृष्ट्या खचून गेले या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानी ची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आज उमरखेड , महागाव या तालुक्यातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी केली शिवाय जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली उमरखेड च्या दहागाव पूल आणि मार्लेगाव पूल ची पाहणी केली 2 दिवस पूर्वी दहागाव येथे नाल्याच्या पुरात बस वाहून गेली होती त्यात 4 जणांचा मृत्यू झाला होता तर मार्लेगाव येथे पैनगंगा नदीवर पूल आहे त्या पुलावरून पाणी असल्याने 35 तास पासून विदर्भ- मराठवाडा अशी वाहतूक थांबली होती त्या दोन्ही ठिकाणी केली जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
सांगलीत 2009 मध्ये घडलेल्या मिरजेच्या गणेशोत्सव दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता
सांगली : 2009 मध्ये घडलेल्या मिरजेच्या गणेशोत्सव दंगल प्रकरणातील106 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन माजी महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेना जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, शहर प्रमुख विकास सुर्यवंशी यांच्यासह 106 जणांच्या मुक्तता झाली. 2009 मध्ये घडलेल्या जातीय दंगलीनंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय गणितं बदलून विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडासाफ झाला होता.
सुशांत सिंह याचा मित्र कुणाल जानी याला अटक
सुशांत सिंह याचा मित्र कुणाल जानी याला अटक, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी केली अटक,
अर्जुन रामपालची गर्लफ्रेंडचा भाउ अजिलीयोसच्या चौकशीत कुणाल जानीच नाव आलं समोर, ड्रग्स प्रकरणात केली अटक
काल खार भागातून केली अटक