Breaking News LIVE : शाळा, मंदिरांपाठोपाठ नाट्यगृहही सुरु करण्याच्या तयारीत
Breaking News LIVE Updates, 24 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतली. दरम्यान, पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी भारतीय पंतप्रधानांचं स्वागत केलं आहे.
उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत करुन आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, त्यांना भारताच्या पंतप्रधानांचं स्वागत करताना अत्यंत आनंद होत आहे. तसेच या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनीही कमला हॅरिस यांचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कमला हॅरिस संपूर्ण जगासाठी प्रेरणा आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारतात येण्याचंही आमंत्रण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, जर त्या भारत दौऱ्यावर आल्या तर संपूर्ण देशाला खूप आनंद होईल.
धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर जोर
भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वास व्यक्त केलाय की, अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या नेतृत्त्वात द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर पोहोचतील. बैठकी दरम्यान दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर जोर दिला. तसेच परस्पर आणि जागतिक हिताच्या मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. यापूर्वी, भारतातील कोरोना संकटाच्या काळात कमला हॅरिस यांनी मोदींशी फोनवर चर्चा केली होती. हॅरिस यांनी भारताला अमेरिकेचा अत्यंत महत्वाचा भागीदार, अशी उपाधी दिली.
अनिल देशमुख चौकशीत सहकार्य करत नाहीत, ईडीचा देशमुखांविरोधात कारवाईसाठी कोर्टात अर्ज
सक्त वसुली संचालनायानं सुरु केलेली चौकशी आणि बजावलेल्या समन्सला वाट्याण्याच्या अक्षता लावणार्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची चिन्ह आहेत. अनिल देशमुख यांनी तपासयंत्रणेविरोधात पुकारलेल्या असहकाराच्या विरोधात ईडीनं मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात (किल्ला कोर्ट) धाव धेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर येत्या 28 सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदावर असताना मुंबई पोलिसांना दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबइ मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयनं याप्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल केला. सीबीआयनं गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआय आणि ईडी मार्फत या प्रकरणाचा तपास आणि चौकशी सुरु झाली. ईडीने वारंवार अनिल देशमुखांना चौकशीला बोलावलं मात्र ते चौकशीला सतत गैरहजर राहीले.
चौकशीला हजर रहाण्यासाठी त्यांना तब्बल पाचवेळा समन्सही बजावले, त्याला देशमुख यांनी वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या. त्यामुळे अखेर अनिल देशमुख हजर रहात नाही अथवा चौकशीला सहकार्य करीत नसल्याचा आरोप करत ईडीनं आयपीसी कलम 174 अन्वये मुंबई दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल करून देशमुखांविरोधात कारवाई करावी अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 29 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
अनिल देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना दोन वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आले. मात्र सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत.
शाळा, मंदिरांपाठोपाठ नाट्यगृहही सुरु करण्याच्या तयारीत
शाळा, मंदिरांपाठोपाठ नाट्यगृहही सुरु करण्याच्या तयारीत. जागतिक मराठी रंगभूमी दिनी नाट्यगृह सुरु होणार. नाट्यकलाकारांना मोठा दिलासा. येत्या 5 नोव्हेंबरला जागतिक मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. अनलॉकनंतर अनेक कलाकारांची नाट्यगृह सुरु करण्याची मागणी केली होती.
आरोग्य विभागाची उद्या आणि परवा होणारी परीक्षा पुढे ढकलली
आरोग्य विभागाची उद्या आणि परवा होणारी परीक्षा पुढे ढकलली. हॉल तिकीट गोंधळानंतर उद्या आणि परवा होणारी परीक्षा पुढे ढकलली.
विद्यार्थ्यांना त्यानुसार आरोग्य विभागाकडून एसएमएस, इमेल द्वारे काळविण्यात आले आहे. पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना काही तास आधी परीक्षा रद्द झाल्याने मनस्ताप.
राज्यात येत्या सात ऑक्टोबरपासून भाविकांसाठी मंदिरांची दारंही उघडणार असल्याची सूत्रांची माहिती
राज्यात येत्या सात ऑक्टोबरपासून भाविकांसाठी मंदिरांची दारंही उघडणार असल्याची सूत्रांची माहिती
यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर!
देशभराचे लक्ष लागून असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC Result) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी कोरोनामुळे मुलाखत प्रक्रिया लांबणीवर पडली होती. त्यामुळे निकालालाही उशीर झाला. युपीएससीमध्ये शुभम कुमार याने सर्वाधिक गुण मिळवत देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे.
यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर! अनेक मराठी मुलांचं घवघवीत यश
यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर! अनेक मराठी मुलांचं घवघवीत यश