एक्स्प्लोर

Breaking News LIVE :  वनविभागाकडून संशयित दहशत माजवणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुच राहणार

Breaking News LIVE Updates, 15 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.  

LIVE

Key Events
Breaking News LIVE :  वनविभागाकडून संशयित दहशत माजवणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुच राहणार

Background

आज देशभरात दसऱ्याचा सण साजरा केला जातोय
आज दसरा, रामाने अहंकारी रावणावर विजय मिळवला होता. दसऱ्याला विजयादशमी देखील म्हणतात.  या दिवशी दसऱ्याचा सण आहे. या दिवशी भगवान रामाने अहंकारी रावणाचा वध केला. दसऱ्याला विजय दशमीचा सण देखील म्हणतात. पंचांगानुसार, आज काय आहे खास, जाणून घेऊयात. पंचांगानुसार, विजयादशमीच्या विधीची पूजा 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 01:16 ते दुपारी 03:33 या वेळेत करावी. या दिवशी ‘अस्त्र’ ची पूजा केली जाते.  तसेच भगवान राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांची प्रार्थना देखील करावी.

लायसेन्स नसलेल्या उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली : गुलाबराव पाटील
ड्रायव्हींग लायसेन्स नसलेल्या उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली. मात्र, गेल्या दोन वर्षात विनाअपघात प्रवास सुरू आहे, अशी शेरेबाजी शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगोला येथील कार्यक्रमात केली. यावेळी त्यांनी बोलण्याच्या भरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्यावरही शेरेबाजी केली. तर गुलाबराव पाटील यांनी ईडी, नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे कोणी म्हणाले असते तर कोणी विश्वास ठेवला नसता. कोणतेही वाहन चालवायला लायसेन्स लागते हे आपल्याला माहिती आहे. पण शरद पवार यांनी ज्याच्याकडे कसलेच लायसेन्स नाही त्याला थेट ड्रायव्हर केलं तर अजित पवार यांना कंडक्टर. बाळासाहेब थोरात प्रवासी बनले आणि विना लायसेन्स असलेल्या ड्रायव्हरच्या हातात थेट व्होल्वो बस दिली. मात्र, गेल्या दोन वर्षात कितीही अडचणीचे मार्ग आले तरी या ड्रायव्हरने विनाअपघात गाडी सुसाट सोडल्याची शेरेबाजी गुलाबराव पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर केली. आज सांगोला येथील शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात गुलाबराव पाटील बोलत होते.

अनंत करमुसे मारहाण आणि अपहरण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि जामीन
अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. या प्रकरणात त्यांना तात्काळ जामीनही मिळाला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार ठाण्यातील तरुणाने केली होती. .दरम्यान, आज वर्तक नगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचा जबाब नोंदवून त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने त्यांची दहा हजार रुपयांच्या जामीनावर सुटका केली. 

23:11 PM (IST)  •  15 Oct 2021

वनविभागाकडून संशयित दहशत माजवणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुच राहणार

शुक्रवारी सकाळी पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या  हा संशयित दहशत माजवणार बिबट्या नाही. ताब्यात असणाऱ्या मादी बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. तर वनविभागाकडून संशयित दहशत माजवणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुच राहणार असल्याची प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये यांनी ही  माहिती दिली. 

17:46 PM (IST)  •  15 Oct 2021

माझ्या माहितीनुसार त्यांनी अठरा महिन्यांपूर्वी खासदारांचा निधी गोठवला.. पण, आपण तसं केलं नाही : अजित पवार

माझ्या माहितीनुसार अठरा महिन्यांपूर्वी खासदारांचा निधी गोठवला. आपण मात्र काल 14 ऑक्टोबरला आदेश काढला. प्रतिविधानसभा आमदारांसाठी चार कोटींचा निधी दिला. त्यांच्याकडे अनेक कामं येतात, यासाठी त्यांना आम्ही हा निधी देतो. मी आणि दिलीप वळसे पाटील त्या मंत्रिमंडळात नव्हतो. तेव्हा सात मंत्री त्या बैठकीला होते. उद्धव ठाकरेंसह, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, छगन बुजबळ आणि नितीन राऊत उपस्थित होते. त्यांनी तो निर्णय घेतला. मागच्या सरकारने जो 25-15 ला जो निधी दिलाय तो रद्द करायचा. मला हे माहीतही नव्हतं. मी त्यातील काही मंत्र्यांना विचारलं तर ते म्हणाले आघाडी सरकार गेलं आणि फडणवीस सरकार आलं. तेव्हा त्यांनी 25-15 चा निधी गोठवला आणि तो त्यांच्या विचारांच्या आमदारांना दिला. त्यांनी तसं केलं म्हणून ह्यांनी असं केलं. ही वस्तुस्थिती आहे.

17:35 PM (IST)  •  15 Oct 2021

आयकर विभागाने मुंबईतील दोन रिअल इस्टेट व्यवसाय गट आणि त्यांच्याशी संबंधित काही व्यक्ती आणि संस्थांवर शोध आणि जप्तीची कारवाई

आयकर विभागाने मुंबईतील दोन रिअल इस्टेट व्यवसाय गट आणि त्यांच्याशी संबंधित काही व्यक्ती आणि संस्थांवर शोध आणि जप्तीची कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. ही शोध मोहीम 07 ऑक्टोबर रोजी सुरू झाली असून मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरमध्ये पसरलेल्या सुमारे 70 परिसरांमध्ये केली गेली आहे.

12:25 PM (IST)  •  15 Oct 2021

विजयादशमी निमित्त पुण्यातील देवाच्या आळंदीत उत्साह

विजयादशमी निमित्त पुण्यातील देवाच्या आळंदीत उत्साह पहायला मिळतोय. मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आलाय. संत ज्ञानोबांच्या गाभाऱ्यातील सजावट ही भाविकांचं मन प्रसन्न करत आहे. माऊलींचे हे रूप भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण करत आहे.

07:56 AM (IST)  •  15 Oct 2021

 नाशिकमध्ये बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या गरबा कार्यक्रमावर पोलिसांची कारवाई  

  
बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या गरबा नृत्याच्या कार्यक्रमावर मुंबई नाका पोलिसांची कारवाई

- नामांकित अशोका मेडीकोअर हॉस्पिटलच्या आवारात काल रात्री सुरू होतं गरबा नृत्य.

- कोरोना काळातच हॉस्पिटल प्रशासनाचे बेजबाबदार कृत्य

- कार्यक्रमात शंभरहून अधिक महिला, पुरुष कर्मचाऱ्यांचा होता सहभाग

- मुंबई नाका पोलिस ठाण्यात हॉस्पिटलचे एच आर आशिष सिंग, मॅनेजर संदीप प्रकाश सूर्यवंशी आणि म्युझिक सिस्टीम ऑपरेटर संतोष शेवकणे विरोधात गुन्हा दाखल

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटनाABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 5 PM : 22 Jan 2025 : ABP MajhaAmol Mitkari Baramati| 2-3 टक्के योजनेत भ्रष्टाचार, कोकाटेंच्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले...Santosh Deshmukh Caseआम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख यांच्या पत्नीचं पंकजा यांच्याशी संभाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
Embed widget