एक्स्प्लोर

Breaking News LIVE : शरद पवार आणि नितिन गडकरींमध्ये उद्या पुणे विमानतळावर भेट होणार

Breaking News LIVE Updates, 30 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE :  शरद पवार आणि नितिन गडकरींमध्ये उद्या पुणे विमानतळावर भेट होणार

Background

तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर; देवीच्या दर्शनासाठी जाताय? 'हे' नक्की वाचा

उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजापूर (Tuljapur) मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी शारदीय नवरात्र उत्सव कसा साजरा करावा याबाबत लेखी आदेश काढले आहेत. शारदीय नवरात्रोत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून या उत्सव काळात दररोज केवळ 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. 

भाविकांना मंदिरात प्रवेश असेल मात्र त्यांना अभिषेक इतर विधींना परवानगी नाही. देवीचे महंत, सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत देवीचे कुलाचार विधी संपन्न होणार आहेत. याबाबतचा जिल्हाधिकारी यांचा आदेश माहिती आणि जनसंपर्क कार्यालयानं कळविला आहे.

परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासांच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आली आहे. यात्रा काळात कोरोना नियमांचे पालन बंधनकारक असून हॉटेल, दुकानात असलेल्या कर्मचारी यांचे 2 डोस झालेले असून त्याची यादी प्रशासनाला कळवावी लागणार आहे.

गर्दी होऊ नये आणि कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी दररोज पहाटे 4 ते रात्री 10 या वेळेत फक्त 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. तुळजापूर येथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्यात 15 हजार भाविकांची प्रवेश मर्यादा घातल्याने आगामी काळात गर्दीवर नियंत्रण आणणे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान असणार आहे. 

2009 मध्ये घडलेल्या मिरजेच्या गणेशोत्सव दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता, सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

2009 मध्ये मिरजेत घडलेल्या गणेशोत्सव दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयानं (Sangli District Sessions Court) हा निकाल दिला आहे. 2009 मध्ये घडलेल्या मिरजमधील जातीय दंगलीनंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय गणितं मोठ्या प्रमाणावर बदललेली दिसतात. या दंगलीचा त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील परिणाम झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन माजी महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेना जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, शहर प्रमुख विकास सुर्यवंशी यांच्यासह 106 जणांची यामध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

मिरज शहरामध्ये 2009 दरम्यान झालेल्या जातीय दंगली प्रकरणी 106 जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान ही जातीय दंगली घडली होती. ज्यानंतर या दंगलीचे पडसाद त्यावेळच्या विधानसभा निवडणूकीतही उमटले होते. सध्याच्या आघाडी सरकारकडून या दंगलीचे खटले बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आल्यानं न्यायालयानं हा खटला निकाली काढत, निर्दोष मुक्तता केली आहे.

20:32 PM (IST)  •  01 Oct 2021

शरद पवार आणि नितिन गडकरींमध्ये उद्या पुणे विमानतळावर भेट होणार

शरद पवार आणि नितिन गडकरींमध्ये उद्या पुणे विमानतळावर भेट होणार आहे.  सकाळी 9 वाजता दोघांमध्ये भेट होणार आहे. राज्यातले महामार्गांसंदर्भात दोघांमध्ये भेट होणार असल्याची माहिती आहे.   खासदार सुनिल तटकरे देखील  उपस्थित राहणार आहे. मुंबई गोवा महामार्गासंदर्भात खासदार सुनिल तटकरे गडकरींना निवेदन  देणार  आहे.

16:50 PM (IST)  •  01 Oct 2021

परमबीर सिंग यांच्या निलंबनाबाबत राज्य सरकारची सावध भूमिका


परमवीर सिंह प्रकरणी एकीकडे चांदीवल आयोगाची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे त्यांनी अर्ज केलेली रजा संपून 30 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट देखील परमवीर सिंग यांनी दिलेले नाही. त्यामुळे परमवीर सिंग यांना मेडिकल बोर्ड समोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे. एकूणच सर्व कायदेशीर बाबी तपासून नंतर सरकार निलंबनाची प्रक्रिया करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे 

16:41 PM (IST)  •  01 Oct 2021

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, मुंबई सत्र न्यायालयाकडनं अनिल देशमुखांना समन्स जारी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडनं अनिल देशमुखांना समन्स जारी केली आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहे. ईडीची देशमुख तपसात सहकार्य करत नसल्यामुळे विशेष कोर्टात याचिका केली आहे.  वारंवार समन्स बजावूनही देशमुख चौकशीला गैरहजर राहिले आहे.

14:33 PM (IST)  •  01 Oct 2021

परमबीर सिंह यांच्या निलंबनाबाबत राज्य सरकारची सावध भूमिका

परमबीर सिंह यांच्या निलंबनाबाबत राज्य सरकारची सावध भूमिका,  राज्य सरकार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर निलंबनाची प्रक्रिया सुरू करणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांसोबतची बैठक संपली

परमबीर  प्रकरणी एकीकडे चांदीवल आयोगाची प्रक्रिया सुरू आहे.  दुसरीकडे त्यांनी अर्ज केलेली रजा संपून 30 दिवस पूर्ण झाले आहेत. 

त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट देखील परमबीर  सिंह यांनी दिलेले नाही.

त्यामुळे परमवीर सिंग यांना मेडिकल बोर्ड समोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे.

एकूणच सर्व कायदेशीर बाबी तपासून नंतर सरकार निलंबनाची प्रक्रिया करणार, सूत्रांची माहिती

11:55 AM (IST)  •  01 Oct 2021

तीन लाखांची लाच स्वीकारताना नाशिकमध्ये पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात 

पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल तीन लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Dasara Melava : चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Dasara Melava : ... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Dasara Melava : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडीSushma Andhare Dasara Melava Speech :  देवेंद्रजींचे कान उपटा.. अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोलAaditya Thackeray Dasara Melava Speech : आजोबांची आठवण, शिंदेंची मिमिक्री; आदित्य ठाकरेंचं भाषणSanay Raut Speech Dasara Melava :   2 महिन्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्यासपीठावर; राऊतांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Dasara Melava : चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Dasara Melava : ... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
Gulabrao Patil : कव्वा कबुतर नही बन सकता, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
कव्वा कबुतर नही बन सकता, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Uddhav Thackeray: तुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी निवडलंय, तुला योग्य वाटेल तेच कर; रतन टाटांचा ठाकरेंना मोलाचा सल्ला
तुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी निवडलंय, तुला योग्य वाटेल तेच कर; रतन टाटांचा ठाकरेंना मोलाचा सल्ला
Sanjay Raut Dasara Melava 2 महिन्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री या व्यासपीठावर; संजय राऊतांचा CM पदावर दावा, मेळाव्यातून शिंदेंवर जोरदार हल्ला
2 महिन्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री या व्यासपीठावर; संजय राऊतांचा CM पदावर दावा, मेळाव्यातून शिंदेंवर जोरदार हल्ला
Eknath Shinde Dasara Melava : टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरून उरला, ठासून दोन वर्ष पूर्ण केली, मला हलक्यात घेऊ नका : एकनाथ शिंदे
टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरून उरला, ठासून दोन वर्ष पूर्ण केली, मला हलक्यात घेऊ नका : एकनाथ शिंदे
Embed widget