एक्स्प्लोर

2009 मध्ये घडलेल्या मिरजेच्या गणेशोत्सव दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता, सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

मिरज शहरामध्ये 2009 दरम्यान झालेल्या जातीय दंगली प्रकरणी 106 जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे.

सांगली : 2009 मध्ये मिरजेत घडलेल्या गणेशोत्सव दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयानं (Sangli District Sessions Court) हा निकाल दिला आहे. 2009 मध्ये घडलेल्या मिरजमधील जातीय दंगलीनंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय गणितं मोठ्या प्रमाणावर बदललेली दिसतात. या दंगलीचा त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील परिणाम झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन माजी महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेना जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, शहर प्रमुख विकास सुर्यवंशी यांच्यासह 106 जणांची यामध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

मिरज शहरामध्ये 2009 दरम्यान झालेल्या जातीय दंगली प्रकरणी 106 जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान ही जातीय दंगली घडली होती. ज्यानंतर या दंगलीचे पडसाद त्यावेळच्या विधानसभा निवडणूकीतही उमटले होते. सध्याच्या आघाडी सरकारकडून या दंगलीचे खटले बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आल्यानं न्यायालयानं हा खटला निकाली काढत, निर्दोष मुक्तता केली आहे.

मिरज शहरामध्ये 2009 साली गणेशोत्सवा दरम्यान शिवसेनेकडून मिरज शहरामध्ये अफजलखान वधाचा फलक उभारण्यात आला होता. त्यावर लिहिण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मिरज शहरामध्ये जातीय दंगल भडकली होती. दहा ते पंधरा दिवस मिरज शहर या दंगलीत धगधगत होतं. या दंगलीचे पडसाद सांगली जिल्ह्यासह शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले होते. पंधरा दिवस मिरज-सांगली शहरांमध्ये कडक संचारबंदी लागू होती. या दंगली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली महापालिकेचे तत्कालीन महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, मिरज शिवसेनेचे शहरप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या 106 जणांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सांगली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या दंगलीचा खटला सुरु होत, दरम्यान दोन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारकडून हा खटला बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा सत्र न्यायालयानं खटला बरखास्त करून या दंगली प्रकरणी 106 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे, अशी माहिती बचाव पक्षाच्या वकील बिलकीस बुजरूक यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal Nanded News: सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget