Breaking News LIVE : आर्यन खान आणि इतरांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कस्टडी
Breaking News LIVE Updates, 04 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Lakhimpur Kheri : लखीमपूर दुर्घटनेत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू, परिसरात जमावबंदी लागू
लखीमपूर खेरी या ठिकाणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने, आशिष मिश्राने काल आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्याचं सांगण्यात येतंय. या घटनेत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे. प्रशासनाने आता या परिसरात 144 कलम लागू केलं असून विरोधी पक्ष नेत्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून अटकाव करण्यात येतोय. आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतांवर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी दिला आहे.काल रात्रीपासून या ठिकाणी शेतकरी आंदोलनासाठी बसले आहेत. जोपर्यंत दोषींवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून उठणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे.
आज पहाटे साडे चार वाजता लखीमपूर या ठिकाणी शेतकरी नेते राकेश टिकेत पोहोचले असून त्यांनी शेतकऱ्यांची एक बैठक घेतली. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी या बैठकीत केली आहे. जोपर्यंत या दोघांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृत शेतकऱ्यांचं अंतिम संस्कार केलं जाणार नाही असा इशारा राकेश टिकेत यांनी दिला आहे.
School Reopen | आजपासून शाळेची घंटा वाजणार, शिक्षणोत्सव साजरा होणार, मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
आज(सोमवार 4 ऑक्टोबर) राज्यातील शाळा सुरू होणार आहे. या निमित्ताने दुपारी 12 नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना सुद्धा हा कार्यक्रम दखविण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आज शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी शिक्षणोत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा अनौपचारिक स्वागत केले जाणार आहे. आज उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य हे शाळांना भेटी देणार आहेत. सोबतच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे केलेले स्वागत, नियोजनाचे फोटो समाजमाध्यमावर पोस्ट करण्यास सांगितले आहे. #शिक्षणोत्सव या नावाने फेसबुक, इंस्टा, ट्विटर हे फोटो पोस्ट करण्यात यावेत.
Drugs Case : आर्यन खानची रात्र NCBच्या कोठडीत, आज जामीन अर्जावर सुनावणी
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मोठा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) कालची रात्र आयुष्यात कधीच विसरु शकणार नाही. मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना आजपर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली. मुंबई किनाऱ्यावरील एका क्रूझवर एका पार्टीमध्ये केलेल्या छाप्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. आज दुपारी 2.30 वाजता कोर्ट क्रमांक 8 मध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
आर्यन खानला कालची रात्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कोठडीत काढावी लागली. क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केल्यानंतर न्यायालयानं आर्यन खानसह तिघांना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती. आज त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे आर्यन खानची बाजू न्यायालयात मांडतील. आर्यनवर ड्रग्जचं सेवन आणि खरेदी-विक्री केल्याचा आरोप आहे. आर्यनसह अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा यांच्या जामिनावर देखील आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर इतर पाच आरोपी, म्हणजे नुपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा यांना आज न्यायालयात हजर करण्यात येईल.
आर्यन खान आणि इतरांना 7 ऑक्टोबर पर्यंत एनसीबी कस्टडी
आर्यन खान आणि इतरांना 7 ऑक्टोबर पर्यंत एनसीबी कस्टडी देण्यात आली आहे.
डेव्हिड ज्युलियस आणि अॅड्रेम पॅटापोशियन यांना संयुक्तपणे वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल जाहीर
डेव्हिड ज्युलियस आणि अॅड्रेम पॅटापोशियन यांना संयुक्तपणे वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. Receptors for Temperature and Touch या त्याच्या संशोधनासाठी त्यांना नोबेल जाहीर झाला आहे.
फेसबुकवर अश्लील चाळे करून ब्लॅकमेल, तरुणाने जीवन संपवले
पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीचा उपचार दरम्यान मृत्यू, पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा मृताच्या पत्नीचा आरोप
चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी रात्री हा प्रकार घडला. भीमा काळे वय ४२ असे मृत आरोपीचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथील पारधी वस्ती येथे भीमा काळे राहावयास होता. सोलापूर शहरातील विविध चोरी प्रकरणात काळे याला विजापूर नाका पोलीस ठाण्याने संशयित आरोपी म्हणून त्याला अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान कोठडीत असताना त्याला सर्दी, ताप, खोकला आणि उलट्याचा त्रास सुरू झाला होता. म्हणून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा काल रात्री मृत्यू झाला. मात्र आरोपी भीमा काळे याच्या पत्नी आणि वकिलांनी पोलिसांनी केलेल्या मारहानीमुळे मृत्यू झाल्यचा आरोप केलाय. आपण त्याला भेटायला गेल्यानंतर पोलिसांनी केलेल्या मारहाणमुळे चालता देखील येत नव्हते. पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप आरोपी भीमा काळे याच्या पत्नीने केलाय.
क्रुझवरुन आणखी सहा जण ताब्यात, आणखी ड्रग्ज केलं जप्त, एनसीबीकडून तपास सुरु
क्रुझवरुन आणखी सहा जण ताब्यात, आणखी ड्रग्ज केलं जप्त, एनसीबीकडून तपास सुरु