एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Breaking News LIVE Updates : बस चालकाचा विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

Breaking News LIVE Updates, November 04 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE Updates : बस चालकाचा विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

Background

Petrol-Diesel : केंद्राच्या कपातीनंतर काही राज्यांकडूनही व्हॅट कपातीचा निर्णय, महाराष्ट्र सरकार कधी करणार?
दिवाळीच्या शुभमुहुर्तावर काल केंद्र सरकारकडून सामान्य लोकांना काहीसा दिलासा देणारा निर्णय घेतला गेला. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांची कपात करण्याचा काल निर्णय घेतला. राज्यांनीही त्यांच्या व्हॅट करात कपात करण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. याला प्रतिसाद देत तात्काळ गोव्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा निर्णय जाहीर केला. आता महाराष्ट्रात वॅट करात कधी कपात होणार? असा सवाल केला जात आहे.  केंद्राचा निर्णय आल्यानंतर भाजप शासित राज्यांपैकी गोव्याने व्हॅट कपात केली आहे. गोव्यासह उत्तरप्रदेश, मणिपूर, कर्नाटक, उत्तराखंड या राज्यांनीही अतिरिक्त व्हॅट कपात केली आहे. आता अन्य भाजपशासित राज्य काय निर्णय घेतात याकडेही लक्ष लागून आहे. दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या किमतीवरुन केंद्राच्या विरोधात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. आता केंद्रानं कपातीचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी वॅट कपात कधी करणार  असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गोव्यात पेट्रोल 12 रुपयाने आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त

काल केंद्रानं निर्णय घेतल्यानंतर लगेच गोवा सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे गोव्यात आता पेट्रोल 12 रुपयाने आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त झालं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करुन मोदींनी देशातील जनतेला दिवाळी भेट दिल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या संदेशात म्हटलं . त्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोवा सरकार पेट्रोलच्या दरात अतिरिक्त सात रुपये आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपये कपात करत असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केलं. 

PM Modi On Diwali : पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरच्या जवानांसोबत साजरी करणार दिवाळी
 
PM Modi Diwali 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाही देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जाऊ शकतात. पीएम मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेजवळ जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर, पंतप्रधानांच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचं ठिकाण शेवटच्या क्षणी बदललं जाऊ शकतं. दरम्यान, पंतप्रधान मोदी जेव्हा जेव्हा सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जातात, तेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची भेट गुप्त ठेवली जाते.

20:14 PM (IST)  •  04 Nov 2021

बस चालकाचा विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

आष्टी आगारातून जबरदस्तीने पुण्याला बस घेऊन जाण्यास सांगितल्याने एका एसटी चालकांन बस घेऊन पुण्याकडे जात असताना कडा येथील बस स्थानकातच विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या चालकाला आता आष्टीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय

 

18:20 PM (IST)  •  04 Nov 2021

शेअर बाजारात लक्ष्मीपूजन पूर्ण, शेअर बाजारात मूहूर्त ट्रेडिंगला सुरुवात

मुंबई शेअर बाजारात लक्ष्मीपूजन पूर्ण झालं असून मूहूर्त ट्रेडिंगला सुरुवात झाली आहे. मूहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6.15 ते 7.15 या वेळेपर्यंत सुरु असेल.

 

16:06 PM (IST)  •  04 Nov 2021

आष्टी डेपोत एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्‍न

आष्टी डेपोचे ड्रायव्हर बाळू महादेव कदम यांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आष्टी आगारातून साधारणपणे दोन वाजण्याच्या सुमारास पुणे ही बस पुण्याकडे घेऊन जात असताना कडा बसस्थानकामध्ये चालकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत 

15:51 PM (IST)  •  04 Nov 2021

गोंदियात एसटी कर्मचाऱ्यांचे पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच, प्रवाशांना मनस्ताप

एस टी कर्मचाऱ्यां संपाचा फाटका ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्याचा विचार केला असता या ठिकाणी दिवसाला साडेसात लक्ष रुपयाचा तोटा एस टी महामंडळाला सहन करावा लागत आहे. तर आवाज दिवाळीचा दिवस असल्याने स्वगावी परत येत असलेल्या लोकांना अतिरिक्त भाडे मोजून खाजगी बसेस तसेच काली फिवळी वाहन चालकांना पैसे मोजावे लागत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण करावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यात गेल्या आठ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असून जोपर्यंत राज्य सरकार आमचे विलगीकरण करून घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे आज दिवाळी सारखा सन असल्याने स्वगावी परतणाऱ्या लोकाना याचा फटका बसला असून एसटी महामंडाला तोटा सहन करावा लगत आहे.

14:37 PM (IST)  •  04 Nov 2021

शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी

बुलडाणा : राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात भाजप आमदार श्वेता महाले आक्रमक, शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी , झुणका भाकर खाऊन आणि काळे कंदील लावून केला सरकारचा  निषेध .
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dombivli Ravindra Chavan CCTV :मंत्र्याच्या कारमधून उतरला अन् थेट अंगावर धावला,भाजप नेत्याचा प्रताप!Thar Car Accident : ताबा सुटला,स्टॅन्डवरील तिघांना उडवलं, श्रीगोंद्यात थारच्या अपघाताचा थरारा!Buldhana Python | लोणार सरोवर परिसरात सर्पमित्रांनी रेस्क्यू करत दहा फूटी अजगराला दिलं जीवदानKiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Embed widget