Breaking News LIVE Updates : पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालं
Breaking News LIVE Updates, November 03 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तांवर आयकरची कारवाई
Anil Deshmukh Arrested : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर 13 तासाच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे अखेर ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार हे दिल्लीवरून थेट ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी देखील अनिल देशमुख यांची चार तास चौकशी केली आणि अखेर रात्री 1 वाजताच्या दरम्यान देशमुख यांना ईडीने अटक केली. याची माहिती रात्री सत्यव्रत कुमार यांनी दिली. मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशमुखांना यंदाची दिवाळी कारागृहातच काढावी लागणार आहे. पुढील चौकशीसाठी देशमुखांच्या कोठडीची गरज असल्याचा दावा ईडीच्यावतीनं करण्यात आला.
राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
विक्रमी संख्येने दर दिवशी कोरोना लस देण्याची राज्याची तयारी आहे. यापूर्वी देखील तसे डोस दिले आहेत. आता लसीकरणाला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालं
पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
WHO कडून कोवॅक्सिनच्या आपात्कालीन वापराला मंजुरी
जागतिक आरोग्य संघनटेनने कोवॅक्सिनच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे जगभरातील देशांमध्ये या लसीचा वापर करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
गरोदर पत्नीला जाळण्याचा प्रयत्न, पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू
दिवाळीनिमित्त बाजारपेठा फुलल्या, कल्याण फुलबाजारात मोठी गर्दी
उद्या लक्ष्मीपूजन असल्यानं फुलबाजारात मोठी गर्दी पाहायला मिळतेय.. मुंबईला लागून असलेली मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय चित्र आहे, पाहुयात
तालिबान,पाकिस्तानला मोठा झटका, हक्कानी नेटवर्कचा कमांडर हमदुल्ला मुखलिसची हत्या
अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि पाकिस्तानला मोठा झटका बसलाय. पाकिस्तानच्या आशीर्वादानं प्रभावी ठरलेल्या हक्कानी नेटवर्कचा कमांडर हमदुल्ला मुखलिस याची दहशतवाद्यांनी हत्या केलीय. आयसिसच्या दहशतवाद्यांनी त्याला मारल्याचं सांगितलं जातंय. काबुलमध्ये आत्मघाती हल्ल्यात कमांडर हमदुल्ला मुखलिस मारला गेला. तालिबान सरकारमधील गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचा रणनीतीकार अशी त्याची ओळख होती. काबूलचा ताबा मिळवल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या कार्यालयात हमदुल्ला सगळ्यात आधी घुसला होता. त्यावेळी गनी यांच्या खुर्चीवर बसलेले त्याचे फोटो व्हायरल झाले होते.