Breaking News LIVE : राज्यात आज 29,177 रुग्णांना डिस्चार्ज, 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर 594 जणांचा मृत्यू
Breaking News LIVE Updates, 23 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
रायगडच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यांवर दोन दिवसांत आढळलेले पाच मृतदेह बार्जमधील बेपत्ता व्यक्तींचे असल्याचा अंदाज
मागील दोन दिवसात रायगड जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर पाच अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अलिबाग आणि मुरूडच्या समुद्रकिनाऱ्यावर हे मृतदेह आढळून आले आहेत. रायगड जिल्ह्याच्या मुरूड समुद्रकिनारी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. अर्धनग्न अवस्थेत आढळून आलेल्या या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
राज्यात शनिवारी 40,294 रुग्ण बरे होऊन घरी, 26,133 नव्या रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचं समोर येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहे. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. आज 40,294 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 26,133 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 51,11,095 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.04% एवढे झाले आहे.
मोह मायाची बंधने तोडणारी एकादशी म्हणजे, अश्विन शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी
मानवाच्या सर्व अर्थाचे कारण असते तो त्याच्या मनातील विषयाचा मोह आणि तो मोह नष्ट करणारी एकादशी म्हणजे अश्विन शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी या नावाने प्रचलित आहे. यंदा हजारो वर्षातून येणारा योग्य आला असून याला त्रुस्पर्श वंजूला महाद्वादशी असे म्हणतात. म्हणजे आज एकादशी आहे. द्वादशीही आहे. आणि त्रयोदशीही आहे. अश्विन शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी ही काल सकाळी सव्वानऊ वाजता सुरु झाली. याला वारकरी संप्रदायात स्मार्त एकादशी म्हणतात. ही एकादशी आज सकाळी पावणे सात वाजता संपून द्वादशी लागत असली तरी सूर्याने पाहिलेली एकादशी ही आजची असल्याने वारकरी संप्रदायात अशा एकादशीनं भागवत एकादशी म्हणतात. त्यामुळे आज वारकरी संप्रदाय या मोहिनी एकादशीचे व्रत करीत असतो.
कोरोनानंतर काळ्या बुरशीचा कहर, 14 राज्यांत साथरोग म्हणून जाहीर; कोणत्या राज्यात किती केसेस?
एकीकडे कोरोनाचं थैमान सुरु असताना आता देशासमोर नवीन संकट उभं राहिलं आहे. कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी या आजाराने डोकं वर काढलं आहे. म्युकरमायकोसिस या आजाराने गेल्या काही दिवसात हजारो लोकांना बाधा झाली आहे. आतापर्यंत हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह 14 राज्यांत हा आजार साथीचा रोग जाहीर झाला आहे.
राज्यात आज 29,177 रुग्णांना डिस्चार्ज, 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर 594 जणांचा मृत्यू
राज्यात आज 29,177 रुग्णांना डिस्चार्ज, 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर 594 जणांचा मृत्यू
Mumbai Corona Cases : मुंबईत गेल्या 24 तासात 1431 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Mumbai Corona Cases : मुंबईत गेल्या 24 तासात 1431 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 1470 रुग्णांची कोरोनावर मात, सध्या मुंबईत 28410 अॅक्टिव्ह रुग्ण
CBSE बारावी परीक्षा संदर्भात अंतिम निर्णयासाठी अजून वेळ लागणार
CBSE बारावी परीक्षा संदर्भात अंतिम निर्णयासाठी अजून वेळ लागणार, राज्यांना 25 मे पर्यंत सविस्तर सूचना पाठवण्याचं आवाहन, त्यानंतर केंद्र सरकार याबाबत निर्णय जाहीर करणार
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा नेता हरपला, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल यांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झटणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. मागील महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पोस्ट कोव्हिड उपचारासाठी ते एका खासगी रुग्णालयात दाखल होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. धक्कादायक म्हणजे मागील आठवड्यातच त्यांच्या पत्नी आणि मागील महिन्यात जावयाचे देखील कोरोनाने निधन झाले होते. महामुद पटेल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बळीराजाच्या प्रश्नांसाठी झटत होते. 27 एप्रिलला त्यांचे जावई इरफान पटेल तर 17 मे रोजी पत्नी लैलाबी महामुद पटेल यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले होते.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी दोन दिवसांत बैठक, त्यानंतरच अंतिम निर्णय : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई : विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असेल आणि तिच प्राथमिकता लक्षात घेऊन परीक्षांसंदर्भातील निर्णय लवकरच घेऊ, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. कोरोनाची गंभीर परिस्थिती न्यायालयासमोर मांडू, असंही त्या बोलताना म्हणाल्या. आज सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी दोन दिवसांत बैठक घेणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.