Breaking News LIVE : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची 40.34 कोटींची मालमत्ता जप्त, FEMA कायद्यार्तंगत ईडीची कारवाई
Breaking News LIVE Updates, 21st June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
रविवारी राज्यात 9,101 रुग्ण बरे होऊन घरी, 9,361 नव्या रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 96 टक्क्यांच्या जवळ
राज्यात काल (20 जून) 9,361 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर 9,101 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,19,457 इतकी झाली आहे. काल 190 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यत सध्या 1,32,241 अॅक्टिव्ह केसेस आहेत. सरसकट अनलॉकमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. नवी मुंबईत 19 जून रोजी एकही नव्या रुग्णाची नोंद नव्हती, तर 20 जून रोजी 178 नवीन रुग्णांची नोंद झाली. ठाणे शहरात परवा 61, कल्याण डोंबिवलीत 36, पालघरमध्ये 94 रुग्णांची नोंद झाली होती तर काल ठाणे शहरात 129, कल्याण डोंबिवलीत 113, पालघरमध्ये 353 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.76 टक्के एवढे झाले आहे. राज्यात 190 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.97 टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,95,14,858 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,72,781 (15.12 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 7,96,297 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,683 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आमदार प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना-भाजप युती करण्यासंदर्भात लिहिलेल्या पत्रावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. शिवसेना-भाजप युती व्हावी अशी अनेकांची इच्छा असू शकते. मात्र आमचं स्पष्ट मत आहे की, शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना काय उत्तर द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. जनतेचे प्रश्न आम्ही मांडत आहोत. सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो, पण बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भाजप स्वबळावरच लढत आहे. कुणी कोणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे हे त्यांनी ठरवायचे आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला. आता कुणासोबत कुणी जायचं त्यांनी ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेच्या बांधीलकीतून आम्ही काम करत राहू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
'काँग्रेसनं शेवटपर्यंत स्वबळाचा आग्रह धरला तर शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र' : जयंत पाटील
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर राज्यातल्या राजकारणात चर्चेला ऊत आला आहे. काल मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackeray) स्वबळाच्या घोषणांवर टोला लगावल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेसनं शेवटपर्यंत स्वबळाचा आग्रह धरला तर शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आता जरी स्वबळावर बोलत असली तर परिस्थिती येईल त्यावेळी सगळे आम्ही एकत्र लढू असं आम्हाला वाटतं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
सचिन तेंडुलकर एकविसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट फलंदाज; संगकाराला मागे टाकलं
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला 21 व्या शतकातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून निवडले गेले आहे. स्टार स्पोर्ट्स पोलमध्ये सचिन तेंडुलकरने श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा 21 व्या शतकाच्या महान फलंदाजाच्या शर्यतीत पराभव केला. स्टार स्पोर्ट्सच्या कमेन्ट्री पॅनेलमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण, इरफान पठाण आणि आकाश चोप्रा या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. गावस्कर म्हणाले की, एकविसाव्या शतकातील महान फलंदाजांच्या शर्यतीत सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. सचिन तेंडुलकरने 8 वर्षांपूर्वी 2013 मध्येच कसोटी क्रिकेटला निरोप दिला होता. मात्र, आठ वर्षांनंतरही सचिन तेंडुलकरला या शतकाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे.
मंत्रालयात पुन्हा एकदा बॉम्ब ठेवल्याचा धमकी, मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल
मंत्रालयात पुन्हा एकदा बॉम्ब ठेवल्याचा धमकी, मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची पुन्हा धमकी, मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची पुन्हा धमकी, मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल
महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक उद्या
काँग्रेसचा स्वबळाचा नारा,त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषणातून काँग्रेसवर साधलेला निशाणा, प्रताप सरनाईक यांचा लेटर बॉम्ब, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक उद्या होणार
मोठा दिलासा, आज 13,758 रुग्ण बरे होऊन घरी, तर 6270 नवीन रुग्णांचे निदान, आज मृतांचा आकडाही शंभरीच्या आत
Breaking News LIVE : मोठा दिलासा, आज 13,758 रुग्ण बरे होऊन घरी, तर 6270 नवीन रुग्णांचे निदान, आज मृतांचा आकडाही शंभरीच्या आत
#Maharashtra #corona #coronacases
पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त
पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती ED अर्थात सक्तवसुली संचलनालयाने ट्वीटरच्या माध्यमातून दिलीय. ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची चौकशी सुरू होती आणि मनी लॉड्रींग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता. ईडीने अविनाश भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर छापेही टाकले होते. राज्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांचे अविनाश भोसले हे सासरे आहेत.