Breaking News LIVE : महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज
Breaking News LIVE Updates, 16 June 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Central Railway : मध्य रेल्वेची 'फ्लड रिलीफ टीम' सज्ज, सध्या पाच स्थानकांवर तैनात
वारंवार रेल्वे स्थानकांमध्ये पावसाचे पाणी भरल्यानंतर प्रवासी हे लोकलमध्ये अडकतात. त्यावेळी लोकलमधून बाहेर पडणे देखील धोक्याचे असते. कारण सर्वत्र रुळांवर पाणी साचलेले असते. अशावेळी रेल्वे प्रशासनाला स्थानिक अग्निशमन दलाची किंवा एनडीआरएफ पथकाची मदत घ्यावी लागते. मात्र आता ही पथके येण्याच्या आधीच मध्य रेल्वेचे स्वतःचे आरपीएफ पथक या प्रवाशांना रेस्क्यू करणार आहे. या पथकाने काल (मंगळवारी) ठाण्याच्या मासुंदा तलावात नागरिकांना वाचवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महासंचालक आलोक कंसल, आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार उपस्थित होते.
मध्य रेल्वेच्या आरपीएफने सर्वात पहिली "रेल्वे फ्लड रिलीफ टीम" तयार केली असून या टीममध्ये पंधरा जवानांचा समावेश केला आहे. त्यापैकी 10 पुरुष आणि पाच महिला आहेत. या टीमकडे रेस्क्यू करण्यासाठी बोटी देण्यात आलेल्या आहेत. सध्या पाच स्थानकांवर या बोटी आणि ही टीम तैनात आहे. या टीमला एनडीआरएफ पथकाने पुण्यात प्रशिक्षण दिले आहे. संकटकाळात प्रवाशांचे जीव कसे वाचवावे याचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे.
SSR : सुशांतला ड्रग्ज पुरवल्याचा आरोप असलेल्या आरोपीचा अटकपूर्व जामीन हायकोर्टानं फेटाळला
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याशी संबंधित ड्रग्ज तस्करीच्या केसमध्ये एनसीबीच्या रडावर असलेल्या साहिल शाहचा अटकपूर्व जामीन मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. साहिल शाहवर सुशांत सिंग याच्या साथीदारांना ड्रग्स पुरवल्याचा आरोप आहे. शाहनं पुरवलेले अमलीपदार्थ सुशांतचे हे साथीदार नंतर सुशांतला देत होते.
सदर प्रकरणी एनसीबीनं साहिलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एनसीबीनं मोठ्या प्रमाणात ड्रग्सही जप्त केलं होतं. मात्र एनसीबीची कारवाई टाळण्यासाठी साहिल सध्या फरार आहे. दरम्यान त्याच्या वतीनं प्रथम मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनसीबी कोर्टात दाखल झालेला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज कोर्टानं फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला आव्हान देत साहिलनं मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जो हायकोर्टानं मंगळवारी फेटाळून लावला.
साहिल हा अद्याप फरारच असून एनसीबीचे अधिकारी त्याच्या मगावर आहेत. साहिल हा पूर्वी सुशांत राहत असलेल्या सोसायटीतच राहत होता. सुशांतच्या मृत्यूनंतर एनसीबीनं कलेल्या तपासात सुशांतला ड्रग्स दिल जात असल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणात एनसीबीनं एकापाठोपाठ एक अनेक आरोपींना अटक केली होती.
महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज
महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज,
दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, उत्तर कोकणातही चांगल्या पावसाची शक्यता,
पुढील 2 तासात जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पाऊस ,
औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये देखील पुढील 2 तासात मुसळधारेचा अंदाज,
महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज
महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, उत्तर कोकणातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुढील 2 तासात जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये देखील पुढील दोन तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
संभाजीराजे आणि समन्वयक यांच्याबरोबर उद्या मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक
संभाजीराजे आणि समन्वयक यांच्याबरोबर उद्या मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक, अशोक चव्हाण यांच्यासह मराठा आरक्षण उपसमितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार,
उद्या संध्याकाळी 5.30 वाजता या महत्वपूर्ण बैठकीला होणार सुरुवात, पहिल्याचं मूक आंदोलनानंतर होणाऱ्या बैठकीकडे मराठा समाजाचे लक्ष
मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडनदी, निर्मला नदी, तेरेखोल नदीला पूर
मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडनदी, निर्मला नदी, तेरेखोल नदीला पूर आला आहे. कणकवली मधील गडनदीला पूर आल्याने किर्लोस -गोठणे गावचा संपर्क तुटला आहे. निर्मला नदीला पूर आल्यामुळे आंबेरी पूल पाण्याखाली गेल्याने 27 गावांचा संपर्क तुटला आहे. तेरेखोल नदीला पूर आल्याने बांदा वाजारपेठेत पाणी शिरले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा पुलावर सुद्धा पाणी असल्याने त्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पुढील तीन चार दिवस कोकणांत मुसळधार पावसाची शक्यता
पुढचे 3, ४ दिवस कोकणांत मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई ठाणे,
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज