SSR : सुशांतला ड्रग्ज पुरवल्याचा आरोप असलेल्या आरोपीचा अटकपूर्व जामीन हायकोर्टानं फेटाळला
कारवाई टाळण्यासाठी साहिल सध्या फरार असून, एनसीबी साहिल शाहच्या मागावर
मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याशी संबंधित ड्रग्ज तस्करीच्या केसमध्ये एनसीबीच्या रडावर असलेल्या साहिल शाहचा अटकपूर्व जामीन मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. साहिल शाहवर सुशांत सिंग याच्या साथीदारांना ड्रग्स पुरवल्याचा आरोप आहे. शाहनं पुरवलेले अमलीपदार्थ सुशांतचे हे साथीदार नंतर सुशांतला देत होते.
सदर प्रकरणी एनसीबीनं साहिलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एनसीबीनं मोठ्या प्रमाणात ड्रग्सही जप्त केलं होतं. मात्र एनसीबीची कारवाई टाळण्यासाठी साहिल सध्या फरार आहे. दरम्यान त्याच्या वतीनं प्रथम मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनसीबी कोर्टात दाखल झालेला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज कोर्टानं फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला आव्हान देत साहिलनं मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जो हायकोर्टानं मंगळवारी फेटाळून लावला.
साहिल हा अद्याप फरारच असून एनसीबीचे अधिकारी त्याच्या मगावर आहेत. साहिल हा पूर्वी सुशांत राहत असलेल्या सोसायटीतच राहत होता. सुशांतच्या मृत्यूनंतर एनसीबीनं कलेल्या तपासात सुशांतला ड्रग्स दिल जात असल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणात एनसीबीनं एकापाठोपाठ एक अनेक आरोपींना अटक केली होती.
Sushant Singh Rajput: अखेर अंकिताला भावना अनावर; सुशांतसोबतच्या आठवणी शेअर करत म्हणाली...
14 जून 2020 या दिवशी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं मुंबईतील वांद्रे येथे गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या अचान जाणयाचा धक्का अनेकांनाच बसला. पुढे मुंबई आणि बिहार पोलिसांसह एनसीबी, ईडी अशा तपाय यंत्रणांनीही या प्रकरणीचा तपास हाती घेतला. यातून अनेक धागेदोरे बाहेर पडले आणि कलाविश्वातील ड्रग्ज रॅकेटचं पितळही उगडं पडलं.