Breaking News LIVE : विधिमंडळ अधिवेशनासाठी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीतील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
Breaking News LIVE Updates, 04 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
LIVE
Background
Maratha Morcha : मराठा आरक्षणासाठी आज सोलापुरात आक्रोश मोर्चा, परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलक ठाम
मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात आज, 4 जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा जाणार आहे. या मोर्चासाठी खासदार छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, नारायण राणे, रामदास आठवले यांना निमंत्रण दिलं होतं मात्र यांपैकी कुणीही मोर्चाला येणार नसल्याची माहिती असून नरेंद्र पाटील यांच्याच नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणाहून सकाळी 11 वाजता मोर्चा सुरू होईल. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. तरी आंदोलक मोर्चा वर ठाम आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा जाईल असे सांगण्यात आले आहे. मात्र माहितीनुसार पोलीस चार पुतळा चौकात मोर्चा थांबवतील. शहरात 2 हजार ग्रामीण भागात 2 हजार पोलिसांचा फौजफाटा असणार आहे. शहरात येणारे सर्व मार्गवर नाकेबंदी करण्यात येत आहे. दरम्यान मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक राम जाधव, किरण पवार यांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे.
दरम्यान सोशल मीडियावर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली असल्याचे खोटे संदेश फिरत आहेत. पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने मोर्चा, आंदोलनास मनाई केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.
जळगावात राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; आमदाराचे स्वपक्षीय मंत्र्यावरच गंभीर आरोप
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेत देखील गटबाजी असल्याचं चव्हाट्यावर आलं आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले आमदार चिमणराव पाटील यांनी मी पक्ष सोडून जावे यासाठी मला स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्ते अपमानास्पद वागणूक देत आहेत, असा थेट आरोप एरंडोल-पारोळाचे आमदार यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचं नाव न घेता केल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले आमदार चिमणराव पाटील यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, "अलीकडेच पक्षात नुकतीच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. यात पारोळा तालुक्यात नवीन जिल्हाप्रमुख देण्यात आला आहे. मात्र याबाबत मला साधे विचारात सुद्धा घेतले नाही, माझ्या तालुक्यातील नियुक्तीबाबत मला साधी माहिती देखील देण्यात आली नाही. ही बातमी मला वर्तमानपत्रात वाचल्यावर लक्षात आली. तसेच निधीच्या बाबतीतसुद्धा स्थानिक पातळीवर इतर आमदारांना जसा निधी दिला जातो, तसा आपल्याला दिला जात नाही.", असं म्हणत हेतुपुरस्कर आपल्याला डावलल जात असल्याचा आरोप करीत आमदार चिमणराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
शनिवारी राज्यात 8,395 रुग्ण बरे होऊन घरी, 9,489 नव्या रुग्णांची नोंद
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात काल 8,395 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 9,489 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस एक लाख 17 हजारांच्या वर आहेत. काल मालेगावमध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1289 तर कोल्हापूर शहरात 376 असे एकूण 1665 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आज सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 38 शहरं आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्या प्रकरणावरून मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा
स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्या प्रकरणावरून मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा,
एमपीएससी परीक्षा संदर्भात राज्य सरकार समिती गठित करणार,
ही समिती एमपीएससी परीक्षा संदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार,
स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग
विधानसभा अध्यक्ष निवडणूक या अधिवेशनात होण्याची शक्यता धूसर
विधानसभा अध्यक्ष निवडणूक या अधिवेशनात होण्याची शक्यता धूसर,
कोविड परिस्थितीच कारण देत ही निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता,
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का?
आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत एकूण 20 विषय
आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत एकूण 20 विषय घेण्यात आलेले आहेत
विधिमंडळ अधिवेशनासाठी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीतील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
विधिमंडळ अधिवेशनासाठी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीतील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह ,
सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी विधान भवन परिसरात कोरोना चाचणी सुरू आहे,
शनिवारी एकूण 2200 जणांची चाचणी करण्यात आली त्यापैकी चार जण पॉझिटिव्ह ,
एक लिपिक, फायरमन आणि दोन शिपाई यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ,
रविवारी सुरू असलेल्या चाचण्यांचा अहवाल अजून येणं बाकी आहे,
18 टक्के मुलांना कोरोना होऊन गेला, कोवॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीतून स्पष्ट
भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सीनची लहान मुलांसाठीची क्लिनिकल चाचणी नागपुरात सुरु असून चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्यात तब्ब्ल 18 टक्के मुलांच्या शरीरात आधीच अँटीबॉडी आढळून आले आहे. त्यामुळे 100 पैकी 18 मुले आधीच कोरोनाबाधित होऊन बरे झाली आहेत. याची त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना त्याची कल्पना नसल्याचे समोर आले आहे..