Breaking News LIVE : राज्यातील जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे सहकार विभागाचे आदेश
Breaking News LIVE Updates, 09 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार : मुख्यमंत्री
कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. तिसऱ्या लाटेची टांगती तलवार राज्यावर कायम आहे. त्यामुळे कोरोना थोपवायचा असेल तर नियम पाळावेच लागणार आहे. मात्र, राज्याचं आर्थिक चक्रही चालणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यात, शहरात कोरोना कमी झाला आहे, अशा ठिकाणी निर्बंध शिथिल करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सोबतच 15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यासंदर्भात सोशल मीडियावरून नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत.
Pune Unlock : पुणे आजपासून अनलॉक; निर्बंधात शिथिलता, पुणेकरांना दिलासा
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहणार आहेत तर शहरातील हॉटेल्स रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त शनिवारी आणि रविवारी या सर्व गोष्टींना दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरातील मॉल्स रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. पण मॉलमध्ये लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
शहरातील सर्व हॉटेल चालकांना आणि दुकानदारांना कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी देण्यात आली आहे तसेच पुण्यातील उद्यानंही त्यांचा वेळेनुसार सुरु राहणार आहेत.
Maharashtra Corona Cases: राज्यात काल 4,895 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5,508 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होत आहे. काल 4, 895 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 508 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 44 हजार 388 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.71टक्के आहे.
राज्यात काल 151 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 71 हजार 510 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (8), धुळे (3), हिंगोली (81), अमरावती (82), वाशिम (91), भंडारा (0) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 458अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
लोकसभा आणि राज्यसभेत भाजप खासदारांसाठी व्हिप जारी, लोकसभेत उद्या आणि राज्यसभेत उद्या-परवाचा व्हिप
लोकसभा आणि राज्यसभेत भाजप खासदारांसाठी व्हिप जारी, लोकसभेत उद्या आणि राज्यसभेत उद्या-परवाचा व्हिप, उद्या लोकसभेत 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा होण्याची दाट शक्यता
मोहरमसाठी मार्गदर्शक सूचना जारी
मोहरमसाठी मार्गदर्शक सूचना जारी
- मातम मिरवणुका काढण्यास बंदी, घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळावा.
- सोसायटीतील नागरिकांनाही एकत्रित दुखवटा करू नये. वाझ/मजलीस ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावेत
- ताजिया/आलम काढू नये सबील/छबीलसाठी शासनाची परवानगी आवश्यक, बाटलीबंद पाणीच द्यावे लागणार.
राज्यातील जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे सहकार विभागाचे आदेश
राज्यातील जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे सहकार विभागाने आदेश दिले आहे. कोरोनामुळे अनेक जिल्हा बँकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत तर काही जिल्हा बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपून 15 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी संपला आहे. सहकार विभागाने कोरानामुळे 31 ऑगस्टपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. जिल्हा बँकांच्या निवडणुका 31ऑगस्टनंतर तातडीने घेता याव्या यासाठी आतापासून प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचा आदेश काढण्यात आल्या आहेत
औरंगाबादमधील लसीकरणाच्या काळाबाजार प्रकरणी राजेश टोपे यांचे कारवाईचे आदेश
औरंगाबादमधील लसीकरणाच्या काळाबाजार प्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कारवाईचे आदेश, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना संबंधित घटनेचा एका दिवसात रिपोर्ट देण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश, आरोग्य सेवक गणेश दुरोळेला सस्पेंड करण्याचे आदेश
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन व्हावे या मागणीकरिता पंचगंगा नदी पात्रात आंदोलन, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांचे अनोखे आंदोलन
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन व्हावे या मागणीकरिता पंचगंगा नदी पात्रात आंदोलन, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांचे अनोखे आंदोलन