एक्स्प्लोर

Breaking News LIVE : रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबई येथे नियुक्ती

Breaking News LIVE Updates, 20 August 2021 : देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Breaking News LIVE : रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबई येथे नियुक्ती

Background

Malnutrition : भारत कुपोषणमुक्त होणार? केंद्राकडून रोड मॅप तयार करण्याचं काम सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन घोषणा केली होती की 2024 पर्यंत देशातील सर्व गरिबांना वेगवेगळ्या माध्यमातून व्हिटॅमिन, आयर्न आणि इतर पोषक घटक असलेले तांदूळ देण्यात येणार आहे.  देशातील ज्या लोकांमध्ये पोषणाची कमी आहे त्या लोकांमध्ये या घटकांची कमतरता दूर करण्याचे लक्ष्य आहे. पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी आता सरकार रोड मॅप तयार करत आहे. 

सायन्स मॅग्जिन असलेल्या द लॅन्सेन्टच्या एका आकडेवारीनुसार, आपल्या देशातील प्रत्येकी दुसरी महिला ही कुपोषणाची बळी आहे. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येकी चौथे बालक हे कुपोषणाचे बळी आहे. भारतातील प्रत्येकी तिसरे बालक हे लहान उंचीचे आहे. तसेच भारतातील प्रत्येकी पाचवे बालक हे शारीरिकरित्या दुर्बल आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा जगात 94 वा क्रमांक लागतोय. 

जीडीपीचे नुकसान
देशातील पाच वर्षांच्या आतील बालकांच्यामध्ये होणाऱ्या मृत्यूपैकी 68 टक्के मृत्यू हे कुपोषणामुळे होत असल्याचं स्पष्ट आहे. कुपोषणामुळे देशाला दरवर्षी 7400 कोटी रुपयांचे नुकसान होतंय. अविकसित बालकं ही प्रौढ झाल्यानंतर इतरांच्या तुलनेत 20 टक्के कमी आर्थिक लाभ मिळवतात हेही स्पष्ट झालं आहे. 

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांना 2024 पर्यंत आता फोर्टिफाईड तांदूळ देण्याची घोषणा केली आहे. या तांदळाची निर्मिती करताना त्यामध्ये व्हिटॅमिन, आयर्न आणि इतर 12 पोषक घटक मिसळली जाणार आहेत. सुरुवातीला हा प्रकल्प पायलट बेसिसवर राबवण्यात येणार आहे. 

Aghanistan News : नागपुरातून अफगाणिस्तानात परत पाठवण्यात आलेला नूर मोहम्मद तालिबानी तुकडीत सहभागी?

दोन महिन्यांपूर्वी भारतात / नागपुरात बेकायदेशीर राहत असल्याच्या आरोपात नूर मोहम्मद नामक अफगाणिस्तानी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्राथमिक चौकशी करून नूर मोहम्मदला नागपूर पोलिसांनी हद्दपार करत अफगाणिस्तानला परत पाठवले होते. तोच नूर मोहम्मद आता तालिबानच्या एका तुकडीत हातात बंदूक घेऊन सहभागी झाल्याचे फोटो सध्या वायरल होत आहेत.

वायरल होत असलेला तो फोटो नूर मोहम्मदचाच आहे की, नाही? हे ठामपणे सांगता येणं शक्य नसल्याचं नागपूरच्या पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे.

विशेष म्हणजे, पोलिसांनी नूर मोहम्मदला ताब्यात घेतलं होतं, तेव्हा त्याच्या मोबाईल फोनमध्ये काही तालिबानी व्हिडीओ आढळले होते, तसेच तो काही तालिबानी नेत्यांचे ट्विटर फॉलो करत असल्याचंही पोलिसांना आढळलं होतं. तेव्हा नूरच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीचे व्रण दिसून आले होते. मात्र, नंतर नागपूर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत नूर मोहम्मदनं नागपुरात कुठलेही बेकायदेशीर कृत्य केलं नसल्याचं लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला हद्दपार करण्याचा निर्णय घेत त्याला परत पाठविलं होतं.

21:41 PM (IST)  •  20 Aug 2021

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबई येथे नियुक्ती

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबई येथे नियुक्ती. निधी चौधरी यांची मुंबईतील आयटी विभागाच्या संचालक पदी नियुक्ती. डॉ. महेंद्र कल्याणकर यांची रायगडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.

21:08 PM (IST)  •  20 Aug 2021

पुण्यातील आंबील ओढा परिसरातील बांधकामे हटवण्यास पुणे सत्र न्यायालयाने दिलेली स्थगिती न्यायालयाने उठवलीय

पुण्यातील आंबील ओढा परिसरातील बांधकामे हटवण्यास पुणे सत्र न्यायालयाने दिलेली स्थगिती आज न्यायालयाने उठवलीय. त्यामुळे महापालिकेने कारवाई करायची ठरवल्यास आंबील ओढा परिसरातील बांधकामांविरोधात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येऊ शकते. विशेष म्हणजे वरिष्ठ न्यायालयात अपील करेपर्यंत तरी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यास मनाई करण्यात यावी ही आंबील ओढा परिसरातील नागरिकांची मागणीही न्यायालयाने फेटाळलीय. पुणे महापालिकेकडून 24 जुनला आंबील ओढा पात्रातील अतिक्रमणे हटवण्याचा प्रयत्न झाल्यावर स्थानिकांकडून त्याला जोरदार विरोध झाला होता आणि राजकिय आरोप-प्रत्यारोप ही झाले होते. मात्र, दुपारी स्थानिकांकडून न्यायालयात दाद मागण्यात आल्यावर कारवाईला स्थगिती देण्यात आली होती.

20:25 PM (IST)  •  20 Aug 2021

राज्यातील नगरपंचायत, नगर परिषद निवडणुकांची तयारी सुरू, सुमारे 150 नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी

राज्यातील नगरपंचायत, नगर परिषद निवडणुकांची तयारी सुरू.सुमारे 150 नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी. 23 ऑगस्टपासून निवडणुकांच्या पूर्वतयारीला सुरुवात होणार आहे.  राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रभागनुसार प्रारूप आराखडा बनविण्याचे निर्देश दिले आहे.

19:21 PM (IST)  •  20 Aug 2021

मुखेड तालुक्यातील बामणी येथील रहिवाशी ITBP मधील असिस्टंट कमांडन्ट सुधाकर शिंदे छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद

मुखेड तालुक्यातील बामणी येथील रहिवाशी ITBP मधील असिस्टंट कमांडन्ट सुधाकर शिंदे छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद.

19:18 PM (IST)  •  20 Aug 2021

भारतात राहून तालिबानचे व तालिबानच्या कारवायाला समर्थन करणाऱ्या विरोधात सांगलीत तक्रार

भारतात राहून तालिबानचे व तालिबानच्या कारवायाला समर्थन करणाऱ्या विरोधात सांगलीत तक्रार. स्वरा भास्कर, मौलाना सज्जाद नोमानी, शफीकुरहमान बर्क, शायर मुन्नवर राणा यांच्या विरोधात सांगली मधील विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget