Malnutrition : भारत कुपोषणमुक्त होणार? केंद्राकडून रोड मॅप तयार करण्याचं काम सुरु
Malnutrition : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2024 पर्यंत गरिबांना फोर्टिफाईड तांदूळ देण्याचं जाहीर केलं आहे. त्यावर आता केंद्र सरकारने काम सुरु केलं आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन घोषणा केली होती की 2024 पर्यंत देशातील सर्व गरिबांना वेगवेगळ्या माध्यमातून व्हिटॅमिन, आयर्न आणि इतर पोषक घटक असलेले तांदूळ देण्यात येणार आहे. देशातील ज्या लोकांमध्ये पोषणाची कमी आहे त्या लोकांमध्ये या घटकांची कमतरता दूर करण्याचे लक्ष्य आहे. पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी आता सरकार रोड मॅप तयार करत आहे.
सायन्स मॅग्जिन असलेल्या द लॅन्सेन्टच्या एका आकडेवारीनुसार, आपल्या देशातील प्रत्येकी दुसरी महिला ही कुपोषणाची बळी आहे. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येकी चौथे बालक हे कुपोषणाचे बळी आहे. भारतातील प्रत्येकी तिसरे बालक हे लहान उंचीचे आहे. तसेच भारतातील प्रत्येकी पाचवे बालक हे शारीरिकरित्या दुर्बल आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा जगात 94 वा क्रमांक लागतोय.
जीडीपीचे नुकसान
देशातील पाच वर्षांच्या आतील बालकांच्यामध्ये होणाऱ्या मृत्यूपैकी 68 टक्के मृत्यू हे कुपोषणामुळे होत असल्याचं स्पष्ट आहे. कुपोषणामुळे देशाला दरवर्षी 7400 कोटी रुपयांचे नुकसान होतंय. अविकसित बालकं ही प्रौढ झाल्यानंतर इतरांच्या तुलनेत 20 टक्के कमी आर्थिक लाभ मिळवतात हेही स्पष्ट झालं आहे.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांना 2024 पर्यंत आता फोर्टिफाईड तांदूळ देण्याची घोषणा केली आहे. या तांदळाची निर्मिती करताना त्यामध्ये व्हिटॅमिन, आयर्न आणि इतर 12 पोषक घटक मिसळली जाणार आहेत. सुरुवातीला हा प्रकल्प पायलट बेसिसवर राबवण्यात येणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी सध्या सुरु असलेल्या विविध योजनेंच्या मार्फत आणि मध्यान आहार योजनेच्या मार्फत करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :