Breaking News LIVE : भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींच्या विरोधात अॅड. प्रियंका टिबरीवाल यांना भाजपची उमेदवारी
Breaking News LIVE Updates, 10 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
पहाटे 4.50 पासून दुपारी दीडपर्यंत कधीही करा श्रीगणेशाची प्रतिष्ठापना
पहाटे 4.50 मिनीटांपासून दुपारी दीडपर्यंत कधीही करा श्रीगणेशाची प्रतिष्ठापना.
कोरोनाने गणेशोत्सवातही बदल करावे लागणार
सर्वत्र मंगलमय वातावरण घेऊन येणाऱ्या श्रीगणेशाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक झाले आहेत. आज (दि. 10 सप्टेंबर) शुक्रवारी श्रीगणेश चतुर्थीदिनी गणपतीची घरी पहाटे 4.50 पासून दुपारी 1.50 पर्यंत कधीही प्रतिष्ठापना करू शकतो, अशी माहिती दाते पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत कलम 144 लागू; 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान जमावबंदी
गणपतीच्या आगमनाला फक्त काही तास शिल्लक आहेत. या दरम्यान मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav 2021 ) काळात गर्दी होऊ नये म्हणून मुंबईत कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान मुंबईत जमावबंदी असणार आहे. मुंबई पोलिसांकडून या संदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी सणासुदीच्या काळात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. गणोशोत्सव, नवरात्रोत्सवात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. कलम 144 नुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
गणपती विसर्जनासाठी ऑनलाइन स्लॉटचा जास्तीत जास्त वापर करा, ठाणे पालिका आयुक्तांचे आवाहन
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीं विसर्जनासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची आणि विसर्जन घाटांची आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. यावेळी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता विशेष खबरदारी घेत यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.
या पहाणीच्या वेळी महापालिका आयुक्तांनी एबीपी माझाशी विसर्जनाबाबत सविस्तर बातचीत केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा सुरु करण्यात आली आहे. ही सुविधा www.ganeshvisarjan.covidthane.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी या बुकिंग सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यावर्षीही 9 प्रभाग समितीतंर्गत फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची अँटीजन चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
महाज्योतीची MPSC/UPSC च्या ऑनलाइन विना विद्यावेतन प्रशिक्षणासाठी परीक्षा, काल सूचना, चार दिवसात परीक्षा, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
13 सप्टेंबरला हाज्योतीची MPSC/UPSC च्या ऑनलाइन विना विद्यावेतन प्रशिक्षणासाठी परीक्षा आहे
9 तारखेला म्हणजे काल सायंकाळी महाज्योतीने विद्यार्थ्यांना सूचित केले
काल जाहीर केले आणि लगेच चार दिवसात परीक्षा, महाज्योतीचा अजब कारभार
बरेच विद्यार्थी दिल्ली,मुंबई, पुणे येथे आहेत
इतक्या तातडीने परीक्षा जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे
परीक्षेसाठी दिल्लीतून मुंबईत येण्याची कसरत करावी लागणार ती ही इतक्या कमी काळात
त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे
मॅंचेस्टरमध्ये होणारी पाचवी कसोटी रद्द, भारताने मालिका 2-1 ने जिंकली
मॅंचेस्टरमध्ये होणारी पाचवी कसोटी रद्द, भारताने मालिका 2-1 ने जिंकली
भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींच्या विरोधात अॅड. प्रियंका टिबरीवाल यांना भाजपची उमेदवारी
पश्चिम बंगालमधल्या भवानीपूर पोटनिवडणुकीत ममतांविरोधात भाजपचा उमेदवार निश्चित झाला आहे. निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराबद्दल ज्यांच्या याचिकेवर कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले त्या अॅड. प्रियंका टिबरीवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या 2014 पासून भाजपमध्ये असून याआधी नगरसेवक आणि आमदारकीची निवडणूक हरल्या आहेत.
समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या दोन कंपन्यांना 329 कोटी रुपयांचा दंड
समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या मेसर्स मोंटे कार्लो लिमिटेड आणि आयर्न ट्रँगल लिमिटेड या दोन कंपन्यांना 329 कोटी रुपयांचा दंड. अवैधरित्या गौण खनिज उत्पादन केल्यामुळे दोन तहसीलदारांनी ठोठावला होता दंड. जालना आणि बदनापूर तहसीलदारांनी या दोन कंपन्याकडे मिळून 329 कोटी रुपये वसूल करण्याची नोटीस बजावली होती. या दंडाच्या विरोधात हे दोन कंत्राटदार औरंगाबाद खंडपीठ मध्ये गेले होते. हे दंड वसूल करण्याला स्थगिती द्यावी आणि हा दंड रद्द करावा अशी त्यांची मागणी होती या कंपन्यांच्या सर्व याचिका गुरुवारी औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावल्या. या दोन्ही कंपन्या मिळून 329 कोटी रुपयांचा दंड कायम ठेवला. बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी यासंदर्भात पहिल्यांदा तक्रार दाखल केली होती
पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना दुपारपर्यंत होणार
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मानाचे गणपती मंडळानी हा आनंदाचा उत्सव मागील वर्षाप्रमाणे साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मानाचे पाचही गणपतीची तसेच प्रमुख गणपती प्राणप्रतिष्ठापना आज दुपारपर्यंत होणार आहे. कोरोनामुळे प्रतिष्ठापनेआधी मिरवणुका निघणार नाहीत...सर्व गणपतीचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून भक्तांना घेता घेता येणार आहे