एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Breaking News LIVE : मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात रविवारी शहरात कडक संचारबंदी

Breaking News LIVE Updates, 02 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE : मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात रविवारी शहरात कडक संचारबंदी

Background

Thane : गणेशोत्सव नियमावलीचा पुनर्विचार करा, ठाण्यातील गणेश मंडळांची राज्य सरकारकडे मागणी
राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी गणेशोत्सव नियमावली जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नियमावलीचा पुनर्विचार करावा, तसेच, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर बाळासाहेबांचा सुपुत्र या नात्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. असं झालं नाही तर येत्या काही दिवसात ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असाही इशारा समितीने दिला आहे.

Maratha Reservation : मोठी बातमी... मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली 
मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation update) सुप्रीम कोर्टातून (Supreme Court )अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केल्यानंतर या निकालाच्या 102 व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर केंद्राने केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली. या आयोगाच्या स्थापनेनंतर एस ई बी सी आरक्षणाचे नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींच्या सहीने केवळ याचा आयोगाला असल्याचे निकालात म्हटले आहे. राज्यांना हे अधिकार नसल्याचं मत खंडपीठाने नोंदवलं होतं. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने अपील केलं होतं. पण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आज सुप्रीम कोर्टात केंद्राचीही पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. याचा अर्थ एस ई बी सी सारखे नवे प्रवर्ग निर्माण करायचे असतील तर हा निर्णय केवळ केंद्रीय पातळीवरच होऊ शकतो.

Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी 9,195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, मालेगावात रुग्णसंख्या शुन्यावर
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे.  राज्यात आज 9, 195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,634 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 58,28, 535 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.01 टक्क्यावर गेला आहे. तर राज्यात आज 252 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 667 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात कोल्हापुरात सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे, कोल्हापुरात 1057 रुग्ण तर मालेगावात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही.

ABP Majha Exclusive : 'अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुखांचा हात', स्वीय सचिव पलांडेंची कबुली, कारवाईचा तपशील माझाच्या हाती 
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या परिवाराविरुद्ध ईडीने आतापर्यंत केलेल्या कारवाईचा संपूर्ण तपशील माझाच्या हाती लागला आहे.  ईडी कोर्टात अनिल देशमुख आणि त्यांच्या परिवाराविरुद्ध मोठा आरोप करण्यात आला आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे, अनिल देशमुख यांचे अटक झालेले स्वीय सचिव  संजीव पलांडे यांनी ईडीला कबुली दिली आहे की पोलीसांच्या बदल्यांमध्ये खास करुन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा हात होता. परमबीर सिंह यांनी 4 मार्चला ज्ञानेश्वरी इथे झालेल्या बैठकीत अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे आरोप आपल्या तक्रारीमध्ये केला होता. ती बैठक झाल्याची कबुली देखील पलांडे यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिली आहे. पलांडे यांच्या या कबुलीमुळं अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. 

21:33 PM (IST)  •  02 Jul 2021

सोलापूर शहरात पुन्हा लसीकरणाला ब्रेक

सोलापूर शहरात पुन्हा लसीकरणाला ब्रेक, 

उद्या महानगरपालिका क्षेत्रात कुठेही लसीकरण होणार नाही,

लसींचा पुरवठा न झाल्याने निर्णय,

मागील आठवड्यात ही 5 दिवस लसीकरणाची मोहीम होती बंद,

30 तारखेला जवळपास साडे सहा हजार लसी प्राप्त झाल्या होत्या,

काल आणि आज दोन दिवस या लसी वापरल्या, उद्या पुन्हा बंद

20:49 PM (IST)  •  02 Jul 2021

सोलापूर - मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरात कडक संचारबंदी

सोलापूर - मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरात कडक संचारबंदी,

4 जुलै रोजी पोलीस आयुक्तांकडून कलम 144 अंतर्गत शहरात संचारबंदी लागू,

अत्यावश्यक सेवा कामा व्यतिरिक्त नागरिकांना फिरण्यास मनाई,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय,

14:39 PM (IST)  •  02 Jul 2021

नवी मुंबईमध्ये गेल्या पाच दिवसांपासून लसीकरण बंद

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लसीकरण गेल्या पाच दिवसापासून बंद असल्याने शहरवासियांची चांगलीच गैरसोय होत आहे. महानगरपालिकेकडून शहरात 74 लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले आहेत. मात्र गेल्या पाच दिवसांपासून लस मिळत नसल्याने सर्व ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आले आहे. फक्त तीन सेंटर वर कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जात आहे. नवी मुंबईत आता पर्यंत 5 लाख 60 हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. दिवसाला 15 हजार लोकांना लस दिली जात होती.मात्र सलग पाच दिवस झाले लसीकरण बंद असल्याने  मोहिमेला ब्रेक लागला आहे. 

13:25 PM (IST)  •  02 Jul 2021

पुण्याचा कोरोना पॉझिटिव्ह दर 4.6 वरुन5.3 टक्क्यांवर : उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्या व्यक्तीचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले असतील अशा व्यक्तींना आऊटडोर खेळ खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही डोस घेतले असतील अशा विद्यार्थ्यांसाठी मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासनाला तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. पुण्याच्या पॉझिटिव्ह दर वाढला आहे. 4.6 टक्क्यावरून हा दर 5.3 झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे अधीचीच नियमावली चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे असंही त्यांनी सांगितलं. 

13:20 PM (IST)  •  02 Jul 2021

पॉझिटिव्ह आलेल्या 23 वारकऱ्यांवर उपचार सुरु : उपमुख्यमंत्री अजित पवार

वारी बाबत ही वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या, बैठका झाल्या होत्या तरीही काहीजण त्यावर चर्चा करत होते. वारीत 23 वारकरी पॉझिटिव्ह आले आहेत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरी लाट अजूनही नियंत्रणामध्ये आली नाही. त्यामुळे काही निंर्णय घ्यावे लागतात असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
Embed widget