(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Headlines 12th June : राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर, वाचा दुपारच्या बातम्या
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
धर्मांतर प्रकरणातील आरोपी शहानवाजचा ताबा गाझियाबाद पोलिसांकडे, तीन दिवसांनंतर स्थानिक कोर्टात हजर करण्याचे आदेश
धर्मांतराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपी शहानवाजला गाझियाबाद पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. ठाणे कोर्टाने (Thane Court) हा निर्णय दिला आहे. तसेच शहानवाजला पुढील तीन दिवसात स्थानिक कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना (Ghaziabad Police) दिले आहेत. गाझियाबाद पोलीस शहानवाजला रस्ते मार्गाने घेऊन जाणार आहेत. (वाचा सविस्तर)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून एकाला अटक; आरोपीला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना सोशल मीडियावरून (Social Media) धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) पथकानं रविवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे (वय 34) असं पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. (वाचा सविस्तर)
"झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन या", वाढदिवसानिमित्त मनसे राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन
राज ठाकरेंच्या वाढदिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रसैनिक हे शिवतिर्थावर येत असतात. मात्र यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रसैनिकांना एक आवाहन केलंय. यावेळी शुभेच्छा द्यायला येताना कुणीही पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन येऊ नका. तर येताना एखादं झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन या असं आवाहन राज यांनी केलं.
(वाचा सविस्तर)
सत्तासंघर्षाच्या निकालाचा एक महिना पूर्ण, सरकार टेन्शन फ्री होण्याऐवजी युतीतलं टेन्शन अधिक वाढलं?
सुप्रीम कोर्टाच्या ज्या एका निकालावर महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य ठरणार होतं, त्या निकालाला एक महिना पूर्ण झाला. 11 मे रोजी घटनापीठाने निकाल दिला, आज 12 जून आहे. निकालानंतर दोन्ही बाजूंनी आपापल्या विजयाचे दावे तर खूप केले. पण महिनाभरात नेमकं काय बदललं की स्थिती राजकीदृष्टया आणखीच किचकट बनलीय याचा विचार करायची वेळ आली आहे. (वाचा सविस्तर)
आळंदीत लाठीमार नाही, फडणवीसांच्या वक्तव्यावर विरोधकांची टीका; राजीनाम्याची मागणी
आळंदीत पालखी सोहळ्या दरम्यान वारकरी आणि पोलीस आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांना लाठीमार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. सत्ताधारी पक्षाकडून लाठीमार नाही तर झटापट झाल्याचं सांगण्यात आलं तर विरोधकांनी या घटनेचा निषेध करत टीका केली आहे. (वाचा सविस्तर)