एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्लॉग माझा स्पर्धा 2018 जाहीर
तुमच्यात दडलेल्या लेखक/लेखिकेला केवळ डायरी, फेसबुक किंवा ट्विटर पुरतेच मर्यादित ठेवू नका. या स्पर्धेत भाग घ्या. ब्लॉगवर नियमित लिहित असाल तर ठिकच, नाही तर ब्लॉग अपडेट करा. ब्लॉग नसेल तर या स्पर्धेच्या निमित्तानं सुरु करा.
मुंबई : फेसबुक, ट्विटरसारख्या आधुनिक माध्यमांच्या व्यासपीठांवर अनेकजण लिहितात. मात्र या लेखनाला दीर्घ स्वरुप आणि रचनात्मक रुप मिळतं, ते ब्लॉगसारख्या व्यासपीठामुळे. या व्यासपीठावरील लेखनास अधिक प्रोत्साहन मिळावं म्हणून एबीपी माझातर्फे दरवर्षी ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा आयोजित करण्यात येते.
मराठी ब्लॉगिंगचं क्षितीज आता चांगलंच विस्तारलं आहे. मराठी ब्लॉगर्सही आता विविध विषयांना धीटपणे भिडताना दिसतात. फक्त स्फूट लेखनच नाही, तर कविता, फोटो, कथा असेही प्रकार हाताळले जात आहेत. अशाच मराठी ब्लॉग आणि ब्लॉगर्सचं कौतुक ‘ब्लॉग माझा’ या मराठीतल्या एकमेव ब्लॉगिंग स्पर्धेच्या रुपाने ‘एबीपी माझा’ दरवर्षी करतं.
यंदाही एबीपी माझातर्फे ‘ब्लॉग माझा २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
तेव्हा मंडळी, तुमच्यात दडलेल्या लेखक/लेखिकेला केवळ डायरी, फेसबुक किंवा ट्विटर पुरतेच मर्यादित ठेवू नका. या स्पर्धेत भाग घ्या. ब्लॉगवर नियमित लिहित असाल तर ठिकच, नाही तर ब्लॉग अपडेट करा. ब्लॉग नसेल तर या स्पर्धेच्या निमित्तानं सुरु करा.
ब्लॉग माझा २०१८ स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिक आणि उर्वरीत पाच जणांचा उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरव केला जाईल. आता कोणती बक्षीसं आहेत, ते गुपित राहू द्या की! शिवाय, तुमच्या निवडलेल्या ब्लॉगला ‘एबीपी माझा’च्या वेबसाईटवर प्रसिद्धी दिली जाईल आणि ‘एबीपी माझा’च्या ‘डिजिटल महाराष्ट्र’ या खास कार्यक्रमात ब्लॉग माझा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल आणि याच कार्यक्रमात विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
...तेव्हा मित्र-मैत्रिणींनो येऊ द्या तुमच्यातल्या लेखक-लेखिकेला जगासमोर!
स्पर्धेसंदर्भातील तुमच्या प्रश्नांची उत्तरं :
· स्पर्धेसाठी एन्ट्री कुठे पाठवाल? - https://abpmajha.abplive.in/
· एन्ट्री पाठवण्याची शेवटची तारीख कोणती? – शनिवार, 24 नोव्हेंबर 2018
· स्पर्धेचा निकाल कधी जाहीर होईल? – 1 ते 5 डिसेंबर दरम्यान
· विजेत्यांचा गौरव कुठल्या कार्यक्रमात होणार? – एबीपी माझाच्या डिजिटल महाराष्ट्र
2018 या कार्यक्रमात मुंबईत, शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 रोजी
स्पर्धेसाठी ब्लॉग प्रवेशिका कशी पाठवाल?
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://abpmajha.abplive.in/ या आमच्या वेबसाईटवरील होम पेजवर असलेल्या ब्लॉग माझा स्पर्धेच्या बॅनरवर क्लिक करा. इथून तुम्ही गूगल फॉर्मवर जाल, तिथे आपल्या ब्लॉगची माहिती, यूआरएल लिंक आणि तुमची व्यक्तिगत माहिती भरा आणि प्रवेशिका दाखल करा
स्पर्धेचं स्वरुप आणि नियम :
· ब्लॉग मराठीतच आणि युनिकोड फॉन्टमध्ये लिहिलेला हवा.
· ब्लॉग ओपन असावा. पासवर्ड प्रोटेक्शन नसावं.
· 18 वर्षांपुढील कुणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं.
· स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना तुम्ही फक्त तुमच्या ब्लॉगची लिंक पाठवणं अपेक्षित आहे. तुमचा ब्लॉग लेख स्वरुपात पाठवू नका. तसेच तुमच्या ब्लॉगवरील मजकूर अद्ययावत असायला हवा. म्हणजे तुमचा ब्लॉग अपडेट नसेल तर ती प्रवेशिका ग्राह्य होणार नाही.
· ब्लॉगमधला कंटेंट स्वत:चाच असावा. जर अन्य स्त्रोतांकडून माहिती घेतली असेल, तर त्यांचा नाममिर्देश करावा. ब्लॉग व त्यातील मजकूर आपलाच असल्याचे सिद्ध करणे, ही स्पर्धकाची जबाबदारी आहे. तुमच्या ब्लॉगद्वारे बौद्धिक संपदा अधिकार, कॉपीराईट कायदा यांचा भंग झाल्यास, उचलेगिरी आढळल्यास त्या ब्लॉगरचा स्पर्धेतला सहभाग व पारितोषिक मिळाल्यास तेही रद्द करण्यात येईल.
· या स्पर्धेसाठी कोणतंही शुल्क नाही.
· एकावेळी एका स्पर्धकाला फक्त एकच ब्लॉग पाठवता येईल. एका स्पर्धकाने दोन प्रवेशिका पाठवल्याचं आढळून आल्यास दोन्ही प्रवेशिका रद्द होतील
· स्पर्धेचा निकाल विजेत्यांनाच फक्त ई-मेलद्वारे निकाल कळवला जाईल, तसंच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही प्रकाशित करण्यात येईल.
· यानंतर ‘एबीपी माझा’च्या डिजिटल महाराष्ट्र या खास कार्यक्रमात ब्लॉग माझा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल आणि याच कार्यक्रमात विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
· सर्वोत्तम ब्लॉग निवडण्याचे अधिकार पूर्णत: परिक्षक आणि स्पर्धा संयोजकांकडे असतील. त्याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण देण्यास परिक्षक, संयोजक, ‘एबीपी माझा’ हे बांधील नसतील. तुमच्या एन्ट्रीज या तुम्हाला अटी मान्य असल्याच्या निदर्शक असतील.
· स्पर्धेचं आयोजन, नियमावली, अटी, बक्षीसं यासंदर्भात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचे अधिकार ‘एबीपी माझा’कडे असतील.
आपले नम्र,
ब्लॉग माझा टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement