मी शिवरायांचा वंशज नाही, पण सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्व प्रवक्त्यांना कुणी दिला ? आता चंद्रकांत पाटलांकडून राऊतांवर पलटवार
मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्य ज्ञान आहे, पण हिंदुत्वविरोध्यांसोबत चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली ? अशी विचारणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना केली.

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती आणि आमचा विषय आहे, भाजपने त्यामध्ये चोंबडेपणा करू नये, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापूरमधून कोल्हापूरच्याच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला होता. या टीकेला आता चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करत प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्य ज्ञान आहे. पण हिंदुत्वविरोध्यांसोबत चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली? तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल ? आणि हो... सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्वप्रवक्त्यांना कुणी दिला ?
मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्यज्ञान आहे. पण हिंदुत्वविरोध्यांसोबत चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली? तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल? आणि हो... सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्वप्रवक्त्यांना कुणी दिला?
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 28, 2022
शिवसेना खासदार संजय राऊत आज शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपचा चांगलाच समाचार घेतला. त्याचबरोबर संभाजीराजे यांनाही टोला लगावला होता.
आमच्यासाठी संभाजीराजेंच्या उमेदवारीचा विषय संपल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी राजेंच्या उमेदवारीवरून होत असलेल्या टीकेवरून भाजपला चांगलेच फटकारले. ते म्हणाले की, या राज्यात विरोधी पक्ष आहे पण ते विरोधासाठी विरोध करताना दिसत आहे. एखादा निर्णय घेतला की त्यावर टीका करायची हे त्यांनी ठरवलं आहे. यातून त्यांना कोणता असुरी आनंद मिळतो काय माहीत नाही, पण त्याची पर्वा न करता महाविकास आघाडी ठामपणे पुढे चालली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते.
संजय राऊतांचा संभाजीराजेंना टोला
मुख्यमंत्र्यांना आरोपाच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या राजेंनाही संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणाच्या मालकीचे नाहीत. महाराज संपूर्ण विश्वाचे आहेत. 42 मतांचा प्रश्न होता, राजकारण करत असताना कोणत्या ना कोणत्या पक्षाचा हात धरावा लागतो. यापूर्वी पक्षप्रवेश केलेला नाही का ? अशी विचारणा करत आम्हाला तोंड उघडायला भाग पाडू नका, असे राऊत म्हणाले. संभाजीराजे यांनी काल मन मोकळं केलं, आता आमच्यासाठी हा विषय संपल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचलं का ?
- नाना पटोलेंच्या 'हातात' असेल तर त्यांनी आपली 42 मतं संभाजीराजेंना द्यावीत, संजय राऊतांचा खोचक टोला
- संभाजीराजे छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी चोंबडेपणा करू नये, संजय राऊतांनी भाजपला फटकारले
Before You Go
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या





















