एक्स्प्लोर

संभाजीराजे छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी चोंबडेपणा करू नये, संजय राऊतांनी भाजपला फटकारले 

छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी त्यामध्ये चोंबडेपणा करू नये, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. आमच्यासाठी संभाजीराजेंच्या उमेदवारीचा विषय संपल्याचे राऊत म्हणाले.

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही, असा आरोप केला होता. राजेंनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेवर टीका होऊ लागल्यानंतर आता शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरमधून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी त्यामध्ये चोंबडेपणा करू नये, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

आमच्यासाठी संभाजीराजेंच्या उमेदवारीचा विषय संपल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी राजेंच्या उमेदवारीवरून होत असलेल्या टीकेवरून भाजपला चांगलेच फटकारले. ते म्हणाले की,  या राज्यात विरोधी पक्ष आहे पण ते विरोधासाठी विरोध करताना दिसत आहे. एखादा निर्णय घेतला की त्यावर टीका करायची हे त्यांनी ठरवलं आहे. यातून त्यांना कोणता असुरी आनंद मिळतो काय माहीत नाही, पण त्याची पर्वा न करता महाविकास आघाडी ठामपणे पुढे चालली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते.

संजय राऊतांचा संभाजीराजेंना टोला  

मुख्यमंत्र्यांना आरोपाच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या राजेंनाही संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणाच्या मालकीचे नाहीत. महाराज संपूर्ण विश्वाचे आहेत. 42 मतांचा प्रश्न होता, राजकारण करत असताना कोणत्या ना कोणत्या पक्षाचा हात धरावा लागतो. यापूर्वी पक्षप्रवेश केलेला नाही का ? अशी विचारणा करत आम्हाला तोंड उघडायला भाग पाडू नका, असे राऊत म्हणाले. संभाजीराजे यांनी काल मन मोकळं केलं, आता आमच्यासाठी हा विषय संपल्याचे ते म्हणाले. 

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जरा हॉट झालं आहे

कोल्हापुरात शिवसंपर्क मोहिमेसाठी आलो आहे, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जरा हॉट झालं आहे. माझा हा दौरा पूर्णपणे संघटनेच्या बांधणीसाठी आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या ज्या सुचना आहेत त्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवणे हा उद्देश आहे. 2024 सालच्या निवडणुकीसाठी शिवसैनिक तयार असला पाहिजे यासाठी हा उपक्रम असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

कार्डिलिय ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाला क्लीन चिट मिळाल्याने संजय राऊत यांनी नवाब मलिक यांचे अभिनंदन केले. राष्ट्रवादीनं अभिनंदन केलं की नाही माहीत नाही. मलिक यांनी हा सगळा गौप्यस्फोट बाहेर काढला असल्याचे ते म्हणाले. 

हे ही वाचलं का ?

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Nashik And Raigad Guardian Minister Name: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget