एक्स्प्लोर

BJP List : भाजपच्या 30 टक्के आमदारांचा पत्ता कट, 110 नावांवर शिक्कामोर्तब; शुक्रवारी पहिली यादी जाहीर होणार 

BJP Candidate List Maharashtra : भाजप आणि त्यांना समर्थन देणाऱ्या 11 मित्रपक्षांच्या जागांवर दिल्लीतील बैठकीत चर्चा झाली असून येत्या शुक्रवारी पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची रणनीती जवळपास निश्चित झाल्याची माहिती असून 30 टक्के उमेदवारही बदलण्यात येणार असल्याची शक्यता आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये भाजपच्या 110 जागांचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती आहे. तसेच येत्या शुक्रवारी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. 

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडली. सुमारे अडीच तास ही बैठक सुरू होती. त्यामध्ये भाजपच्या 105 मतदारसंघांवर आणि समर्थन देणाऱ्या इतर 11 आमदारांच्या जागांवर चर्चा झाली. त्यानंतर जवळपास 110 जागांचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती आहे. 

या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपचे सगळे नेते दिल्लीतून माघारी परतले. देवेंद्र फडणवीस मात्र रात्री दिल्लीतच मुक्कामी राहिले. बैठक संपल्यावर देवेंद्र फडणवीस पुन्हा भाजप मुख्यालयात पोहचले.  

भाजपकडून 110 जागांवर अंतिम निर्णय झाला असून येत्या शुक्रवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये एकूण 30 टक्के उमेदवार बदलण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दिल्लीतील नेते मित्रपक्षांशी चर्चा करणार

भाजपचे बहुतांश उमेदवार ठरल्यानंतर आता राज्यातील भाजपच्या नेत्यांची चर्चा संपली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ज्या जागांवर वाद आहे त्या जागांवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागणार आहे. 

दरम्यान, राज्यातील महायुतीच्या मित्रपक्षांचीही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाने अधिकच्या जागांवर दावा केल्याची माहिती आहे. 

महायुतीकडून रिपोर्ट कार्ड सादर

अडीच वर्षात केलेल्या कामांचं महायुतीकडून आज रिपोर्टकार्ड सादर करण्यात आलं. तीन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने महायुतीच्या भ्रष्टाचाराचा पंचनामा करणारा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. त्याला महायुतीकडून रिपोर्ट कार्डनं उत्तर देण्यात आलं आहे. त्यात विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यात आलंय. त्यात लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज, नदीजोड प्रकल्प यासारख्या योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. जाहीरनामा काढतात पण रिपोर्ट कार्ड काढायला हिंमत लागते, असा टोला एकनाथ शिंदेंना लगावला. तर हे रिपोर्ट नाही तर डिपोर्ट कार्ड आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : IRS समीर वानखेडे विधानसभा लढवणार, पक्षही ठरला!
मोठी बातमी : IRS समीर वानखेडे विधानसभा लढवणार, पक्षही ठरला!
Sanjay Raut : न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन् डोळ्यावरील पट्टी काढली; संजय राऊत भडकले; म्हणाले, आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा!
न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन् डोळ्यावरील पट्टी काढली; संजय राऊत भडकले; म्हणाले, आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा!
Sharad Pawar : शरद पवार प्रदेशाध्यक्षांवर सोपवणार मोठी जबाबदारी; जयंत पाटील म्हणाले, 'आधीच माझ्यावर मोठी जबाबदारी...'
शरद पवार प्रदेशाध्यक्षांवर सोपवणार मोठी जबाबदारी; जयंत पाटील म्हणाले, 'आधीच माझ्यावर मोठी जबाबदारी...'
Katol Vidhan Sabha: लोकसभेला विशाल पाटलांनी मैदान मारलं, आता विधानसभेला विदर्भातील 'या' मतदारसंघात काँग्रेसचा सांगली पॅटर्न?
लोकसभेला विशाल पाटलांनी मैदान मारलं, आता विधानसभेला विदर्भातील 'या' मतदारसंघात काँग्रेसचा सांगली पॅटर्न?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange- Radhakrushna vikhe Patil : मध्यरात्री मनोज जरांगे, राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :17 ऑक्टोबर 2024 : ABP MAJHAABP Majha Headlines : 9 AM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : IRS समीर वानखेडे विधानसभा लढवणार, पक्षही ठरला!
मोठी बातमी : IRS समीर वानखेडे विधानसभा लढवणार, पक्षही ठरला!
Sanjay Raut : न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन् डोळ्यावरील पट्टी काढली; संजय राऊत भडकले; म्हणाले, आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा!
न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन् डोळ्यावरील पट्टी काढली; संजय राऊत भडकले; म्हणाले, आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा!
Sharad Pawar : शरद पवार प्रदेशाध्यक्षांवर सोपवणार मोठी जबाबदारी; जयंत पाटील म्हणाले, 'आधीच माझ्यावर मोठी जबाबदारी...'
शरद पवार प्रदेशाध्यक्षांवर सोपवणार मोठी जबाबदारी; जयंत पाटील म्हणाले, 'आधीच माझ्यावर मोठी जबाबदारी...'
Katol Vidhan Sabha: लोकसभेला विशाल पाटलांनी मैदान मारलं, आता विधानसभेला विदर्भातील 'या' मतदारसंघात काँग्रेसचा सांगली पॅटर्न?
लोकसभेला विशाल पाटलांनी मैदान मारलं, आता विधानसभेला विदर्भातील 'या' मतदारसंघात काँग्रेसचा सांगली पॅटर्न?
मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचा नेता उत्तररात्री पावणेदोनला अंतरवाली सराटीत, गुप्त खलबतं, भाजपकडून मनधरणीच्या हालचाली?
मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचा नेता उत्तररात्री पावणेदोनला अंतरवाली सराटीत, गुप्त खलबतं, भाजपकडून मनधरणीच्या हालचाली?
Nashik Honor Killing Case: आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या गर्भवती मुलीचा घेतला जीव; ऑनर किलिंग प्रकरणी जन्मदात्या पित्याला जन्मठेप
आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या गर्भवती मुलीचा घेतला जीव; ऑनर किलिंग प्रकरणी जन्मदात्या पित्याला जन्मठेप
Rajshree Munde Car Accident: धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये धडक, राजश्री मुंडे किरकोळ जखमी
धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये धडक, राजश्री मुंडे किरकोळ जखमी
Nana Patole : नाना पटोलेंविरोधात भाजपची मोठी खेळी, साकोलीत संघाचा चेहरा उतरवण्याची तयारी, राजकीय घडामोडींना वेग
नाना पटोलेंविरोधात भाजपची मोठी खेळी, साकोलीत संघाचा चेहरा उतरवण्याची तयारी, राजकीय घडामोडींना वेग
Embed widget