एक्स्प्लोर

मोठी बातमी : महादेव जानकर महायुतीतून बाहेर, स्वबळावर लढणार!

Mahadev Jankar Exit From Mahayuti : लोकसभेला महायुतीसोबत असलेले महादेव जानकर यांनी आता महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. महादेव जानकर यांचा पक्ष आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुतीतील जागावाटपावरून जानकर नाराज असल्याची चर्चा होती. 

गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे महायुतीमध्ये नाराज असल्याची माहिती आहे. महायुतीकडे विधानसभेसाठी त्यांनी 40 ते 50 जागांची मागणी केली होती. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळेच त्यांनी आता महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आता राज्यात सर्व जागा स्वबळावर लढणार आहेत. 

महादेव जानकरांनी लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र परभणीतून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभेला आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जानकर प्रयत्नशील होते. पण त्यांना अपेक्षित जागा मिळणार नाही असं लक्षात येताच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 

महायुतीला मोठा धक्का

महायुतीला रामराम केल्यानंतर आता महादेव जानकर यांचा पक्ष राज्यात किती जागा लढवणार हे पाहावं लागेल. परंतु महादेव जानकरांच्या या निर्णयामुळे महायुतीला मात्र मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जातंय. आता भाजप आणि महायुतीकडून जानकरांची नाराजी दूर केली जाणार का हे पाहावं लागेल. 

महायुतीतून बाहेर पडल्यानंतर महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली. आपल्याशी महायुती किंवा महाविकास आघाडीने संपर्क साधला नसून आपण आपल्या पक्षाच्या वाढीसाठी हा निर्णय घेतला आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्रात 288 जागा लढवण्यासाठी आपण तयारी करत असल्याचं जानकर म्हणाले. 

288 जागांची तयारी पूर्ण

महादेव जानकर म्हणाले की, "लोकसभेला महायुतीने आम्हाला एक जागा दिली होती. पण आमचा पक्ष मोठा झाला पाहिजे, आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे यासाठी आम्ही तयारी करत आहोत. राज्यातील 200 मतदारसंघामध्ये प्रत्येक जागेसाठी तीन-तीन अर्ज आले आहेत. आता फक्त 88 जागा राहिल्या आहेत. काही ठिकाणी आम्ही विजयी होऊ, काही ठिकाणी दोन नंबरची मतं घेऊ. काही ठिकाणी 10 हजारांपेक्षा जास्त मतं घेऊ."

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique: 'मला गोळ्या लागल्यात, आता मी जगणार नाही....' छातीत गोळ्या घुसल्यानंतर बाबा सिद्दीकींचे अखेरचे उद्गार
'मला गोळ्या लागल्यात, आता मी जगणार नाही....' छातीत गोळ्या घुसल्यानंतर बाबा सिद्दीकींचे अखेरचे उद्गार
मोठी बातमी : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, पत्नी क्रांती रेडकरनं सांगितलं पक्षाचं नाव
आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, पत्नी क्रांती रेडकरनं सांगितलं पक्षाचं नाव
Nashik News : नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकाची अदलाबदली, 8 जणांवर कारवाईचा बडगा, नेमकं काय घडलं होतं?
नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकाची अदलाबदली, 8 जणांवर कारवाईचा बडगा, नेमकं काय घडलं होतं?
BJP Canidates for Vidhan Sabha: मोठी बातमी: भाजप मुंबईत भाकरी फिरवणार; राम कदमांसह 'या' 5 आमदारांचा पत्ता कट होणार?
मोठी बातमी: भाजप मुंबईत भाकरी फिरवणार; राम कदमांसह 'या' 5 आमदारांचा पत्ता कट होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 12 PM : 17 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNCP Seat Sharing : महायुतीमध्ये राष्ट्रवादीला 60पेक्षा जास्त जागा मिळणार - सूत्रAssam Karar  : 1985चा आसाम करार सर्वोच्च न्यायालयात बहुमताने वैध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique: 'मला गोळ्या लागल्यात, आता मी जगणार नाही....' छातीत गोळ्या घुसल्यानंतर बाबा सिद्दीकींचे अखेरचे उद्गार
'मला गोळ्या लागल्यात, आता मी जगणार नाही....' छातीत गोळ्या घुसल्यानंतर बाबा सिद्दीकींचे अखेरचे उद्गार
मोठी बातमी : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, पत्नी क्रांती रेडकरनं सांगितलं पक्षाचं नाव
आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, पत्नी क्रांती रेडकरनं सांगितलं पक्षाचं नाव
Nashik News : नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकाची अदलाबदली, 8 जणांवर कारवाईचा बडगा, नेमकं काय घडलं होतं?
नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकाची अदलाबदली, 8 जणांवर कारवाईचा बडगा, नेमकं काय घडलं होतं?
BJP Canidates for Vidhan Sabha: मोठी बातमी: भाजप मुंबईत भाकरी फिरवणार; राम कदमांसह 'या' 5 आमदारांचा पत्ता कट होणार?
मोठी बातमी: भाजप मुंबईत भाकरी फिरवणार; राम कदमांसह 'या' 5 आमदारांचा पत्ता कट होणार?
बारामतीच्या कार्यक्रमात शरद पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये अबोला, अमोल मिटकरी संतापून म्हणाले...
बारामतीच्या कार्यक्रमात शरद पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये अबोला, अमोल मिटकरी संतापून म्हणाले...
मोठी बातमी : IRS समीर वानखेडे विधानसभा लढवणार, पक्षही ठरला!
मोठी बातमी : IRS समीर वानखेडे विधानसभा लढवणार, पक्षही ठरला!
Sanjay Raut : न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन् डोळ्यावरील पट्टी काढली; संजय राऊत भडकले; म्हणाले, आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा!
न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन् डोळ्यावरील पट्टी काढली; संजय राऊत भडकले; म्हणाले, आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा!
Sharad Pawar : शरद पवार प्रदेशाध्यक्षांवर सोपवणार मोठी जबाबदारी; जयंत पाटील म्हणाले, 'आधीच माझ्यावर मोठी जबाबदारी...'
शरद पवार प्रदेशाध्यक्षांवर सोपवणार मोठी जबाबदारी; जयंत पाटील म्हणाले, 'आधीच माझ्यावर मोठी जबाबदारी...'
Embed widget