Nitesh Rane : अज्ञातवासात असणारे नितेश राणे अचानक पोहचले पोलीस स्टेशनमध्ये, दीड तास चौकशी
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी सोमवारी अचानक कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली.
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी सोमवारी अचानक कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली. संतोष परब हल्ल्या प्रखरणी नितेश राणे यांची कणकवली पोलिसांनी दीड तास चौकशी केली. नितेश राणे यांच्यासोबत वकील संग्राम देसाईही उपस्थित होते. 27 जानेवारीप्रर्यंत नितेश राणे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर कणकवली पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हजरी लावली आहे.
संतोष परब हल्ला प्रखरणी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी रविवारी आमदार निलेश राणे कणकवली पोलीस स्टेशन हजर होते. याप्रकरणी जवळपास दीड तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशी झाल्यानंतर नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांची दीड तास चौकशी केली. चौकशी संदर्भात कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
संबधित बातम्या :
Nitesh Rane : 'नितेश राणे हेच परब यांच्यावरील हल्याचे मुख्य सूत्रधार', राज्य सरकारचा हायकोर्टात आरोप
Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनिष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live