एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'महाभकास' आघाडीला मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस : चंद्रकांत पाटील

आम्ही सरकारला सांगत होतो की जरा गांभीर्याने या मराठा आरक्षण प्रकरणाकडे लक्ष द्या. पण अशोक चव्हाण यांना ते काही जमलं नाही, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत आरक्षणाची अंमलबजावनी होऊ नये असा निर्णय न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्राच्या इतिहासातील मराठा समाजाच्या आयुष्यातला हा काळा दिवस आहे. महाभकास आघाडीला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आमच्या सरकारने आरक्षण दिले. आरक्षण काही महिन्यांसाठी टिकलं पण नंतर स्थगिती मिळाली. आमच्या सरकारमध्ये कायमस्वरूपी मराठा आरक्षण टिकण्यासाठीचे प्रयत्न झाले. आम्ही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले. मात्र महाभकास आघाडीला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.

खंडपीठाकडे दिलेला विषय पूर्णच होत नाही त्यामुळे तात्पुर्ती स्थगिती नाही. आम्ही सरकारला सांगत होतो की जरा गांभीर्याने या प्रकरणाकडे लक्ष द्या. पण अशोक चव्हाण यांना ते काही जमलं नाही. सरकारने स्थगिती घेऊन स्वतःवर कुऱ्हाड मारून घेतली. दहा टक्के आर्थिक आरक्षण खंडपीठाकडे गेलं पण स्थगिती नाही, तामिळनाडूत आरक्षणाला स्थगिती नाही. मग आपल्या सरकारला हे का नाही जमलं? उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांपैकी कुणी या विषयाकडे लक्ष का दिले नाही? आम्ही स्वस्त बसणार नाही. या सरकारला आरक्षण टिकवता आले नाही हे करंटे आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली.

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानी स्थगिती दिली आहे. मात्र प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयानंतर मराठा समाजाच्या उमेदवारांना शिक्षण आणि नोकऱ्यात एसईबीसी आरक्षण मिळणार नाही. मात्र या आरक्षणानुसार जे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्ण झालेले आहेत, त्यांना या निर्णयाचा फटका बसणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत 2020-2021 या वर्षासाठी कोणतेही प्रवेश मराठा आरक्षणानुसार देऊ नये, पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे सोपवलं जावं, असं निकालात म्हटलं आहे. मराठा आरक्षण प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे जाणार की नाही यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. खरंतर सकाळच्या यादीत हे प्रकरण नव्हतं. परंतु अचानक आज दुपारी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात लिस्ट करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Best Employee Diwali Bonus : बेस्ट कर्मचाऱ्यांना रखडलेला दिवाळी बोनस मिळालाkonkan Refinery Project : कोकणातील रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये करा, सरकरार स्थापन होण्यापूर्वीच मागणीSanjivan Samadhi Sohala | ज्ञानेश्वर माऊलींचा 728 वा संजीवन समाधी सोहळा संपन्नRamdas Kadam On Uddhav Thackeray : ..त्यांना भोगावेच लागणार, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget